Breaking

Sunday, October 31, 2021

परमबीर सिंह बेल्जियममध्ये?; काँग्रेस नेत्याच्या ट्वीटने खळबळ https://ift.tt/3jQCGVm

म. टा. विशेष प्रतिनिधी, माजी गृहमंत्री यांच्यावर खंडणीखोरीचे आरोप करून नंतर गायब झालेले मुंबईचे माजी माजी पोलिस आयुक्त हे नेमके आहेत कुठे, असा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असताना, परमबीर हे बेल्जियममध्ये आहेत, असा दावा काँग्रेस नेते यांनी रविवारी ट्वीटद्वारे केला. परमबीर सिंह यांच्या विरोधात मुंबईसह ठाण्यात वसुलीप्रकरणी अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. ठाणे न्यायालय, तसेच मुंबईच्या किल्ला न्यायालयानेही त्यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर निरुपम यांनी ट्वीट करताना, परमबीर हे बेल्जियममध्ये असल्याचे म्हटले आहे. परमबीर हे मुंबईचे माजी पोलिस आयुक्त असून, मंत्र्यावर खंडणी वसुलीचा आरोप त्यांनी केला होता. ते स्वत:च पाच प्रकरणात वॉन्टेड आहेत. ते बेपत्ता असल्याचे पोलिस म्हणतात. पण ते बेल्जियमला असल्याची माहिती आहे. मग ते बेल्जियमला कसे गेले? त्यांचा मार्ग कुणी खुला केला? आपण त्यांना तेथून परत आणू शकत नाही का, असे प्रश्न निरुपम यांनी केले आहेत. दरम्यान, अनिल देशमुख यांच्याशी संबंधित एका कथित लाचप्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) रविवारी ठाण्यातून संतोष जगताप याला अटक केली. त्याच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करूनही तो चौकशी टाळत होता, असे सीबीआयकडून सांगण्यात आले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3GDKNOQ

No comments:

Post a Comment