कोल्हापूर: कोल्हापूरचे माजी महापौर (Sunil Kadam) व () यांनी () व पालकमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील (Satej Patil) यांच्यावर केलेले आरोप हे निव्वळ वैफल्यापोटी व राजकीय द्वेषापोटी आहेत, असे प्रत्युत्तर कोल्हापूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिले आहे. या प्रसिद्धीपत्रकावर कोल्हापूरचे माजी महापौर आर. के. पवार, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस व माजी स्थायी समिती सभापती राजेश लाटकर, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस आदिल फरास, माजी नगरसेवक विनायक फाळके यांच्या सह्या आहेत. (The NCP has said that the allegations made by and Satyajit Kadam are false) अशा विषयांमध्ये कोणतीही वस्तुस्थिती व चूक नसताना २००४ वर्षांपूर्वीचे जुनेच विषय अनाठायी उकरुन काढून शिळ्या कढीला ते नवीन ऊत आणत आहेत. त्यांची राजकीय अस्तित्वासाठी चाललेली ही केविलवाणी धडपड आहे, असेही या पत्रकात म्हटले आहे. मोठ्या नेत्यांच्यावर चुकीचे आणि निराधार आरोप हे नैराश्यापोटीच करीत आहेत, हे नैराश्य जिल्हा परिषद व गोकुळ दूध संघासह सर्व सत्ता गेल्याचे आहे, हेही आम्ही समजू शकतो. परंतु, चुकीच्या वक्तव्याने लोकांमध्ये संभ्रम निर्माण होतो, याची ही जाणीव ठेवा. या दोन्हीही नेत्यांवर आमचा दृढ विश्वास आहे. कुठेही, कोणीही चौकशी करा, असे पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या मालकीचा ई वार्डमधील रिसनं. ८७४ रमनमळा तलाव हा पर्यटन विकास केंद्रासाठी आरक्षित आहे. त्याचे क्षेत्र १ हेक्टर ८५ आर इतके आहे. त्यामध्ये आजही कसलाही बदल नाही आणि कोणी करूही शकत नाही. ज्ञानशांती कंपनी व आमच्या संगनमताने त्या क्षेत्रामध्ये काही बदल केला आहे, असा जो कदम बंधूंचा आरोप खोटा व बालीश बुध्दीचा आहे. त्यांनी कोल्हापूर शहर सुधारित विकास योजनेच्या आराखड्याचा व्यवस्थित अभ्यास करावा, असे पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. तसेच रि.स.नं. ८७५/ब ३/२/१/अ क्षेत्र १५१२.६५ चौ. मी. व महापालिकेचे ताब्यात असलेले तलावाचा रिसनं. ८७४ क्षेत्र १ हेक्टर ८५ आर व रि.स.नं. ८७३ या क्षेत्रामधील कोणत्याही क्षेत्राचा एक स्क्वेअर फुटाचाही कसलाही बदल झालेला नाही. याबाबत उपअधिक्षक, भूमिअभिलेख करवीर यांच्याकडूनच मोजणी होऊन त्याबाबतीतील जाहीर सुनावणी होऊन नकाशा अंतिम झालेला आहे. सदर मोजणीवेळी जागा मालक, महापालिका सर्व विभागाचे अधिकारी हजर होते. त्यानंतरच महापालिकेने तलावाचे क्षेत्र सोडून इतर क्षेत्राची कब्जेपट्टी मूळ जागा मालकांना दिलेली आहे अशी वस्तुस्थिती आहे व त्यावर पर्यटन व सहल केंद्राचे आरक्षण आजही कायम आहे, असे पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3a65BPU
No comments:
Post a Comment