मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मुंबईचे () विभागीय संचालक यांच्यावर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक दररोज नवे आरोप करत आहेत. या पार्श्वभूमीवर वानखेडे यांच्या कुटुंबीयांनी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांची भेट घेऊन आपली बाजू स्पष्ट करत पाठिंबा मागितला. त्यानंतर वानखेडेंच्या निवासस्थानी भेट दिलेले राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांच्याकडे समीर वानखेडेंनी आपल्याला त्रास दिला जात असल्याची तक्रार केली. यादरम्यान, आपच्या घराची तीन जणांनी रेकी केल्याचा खळबळजनक दावा समीर वानखेडे यांच्या पत्नी, अभिनेत्री यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी तीन जणांनी आमच्या घराची रेकी केली गेल्याचे त्या म्हणाल्या. आमच्या घराबाहेरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा प्रकार चित्रित झाला असल्याचेही त्या म्हणाल्या. (three people have conducted recce of our house says sameer wankhedes wife ) एएनआय या वृत्तसंस्थेने हे वृत्त दिले आहे. काही दिवसांपूर्वी आमच्या घराजवळ तीघे जण आले होते. त्या तिघांनी आमच्या घराची रेकी केली आहे, असे सांगत या प्रकाराचे सीसीटीव्ही फुटेज देखील आम्ही मिळवले असल्याचे क्रांती रेडकर म्हणाल्या. आता आम्ही या प्रकाराची माहिती पोलिसांना देणार असून हे फुटेजही पोलिसांना देणार असल्याचे त्या म्हणाल्या. क्लिक करा आणि वाचा- रेकी करण्यासाठी आलेले लोक भयानक आहेत. ते काय करतील याबाबत काही सांगता येत नाही. माझ्या घरी माझी मुले असतात. ती लहान असल्याने त्यांच्या सुरक्षेची काळजी वाटत आहे, अशा शब्दात क्रांती रेडकर यांनी चिंता व्यक्त केली आहे. आमच्या घरी कर्मचारी असतात. मात्र, मी आणि समीर घरी नसताना आमच्या मुलांची जबाबदारी कोण घेईल?, त्यांची सुरक्षा कोण पाहील?, असे सवाल क्रांती रेडकर यांनी उपस्थित केले आहेत. आमच्या सुरक्षेसाठी काहीतरी केले जावे असे मला वाटते असेही त्या पुढे म्हणाल्या. क्लिक करा आणि वाचा- दरम्यान, समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर आणि वडील ज्ञानेश्वर वानखेडे यांनी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांची भेट घेतली. आपण मुसलमान नसून हिंदू दलित असल्याचे वानखेडे यांनी आठवले यांना सांगितले. त्यावेळी त्यांनी आपल्या जातीसंदर्भातील सर्व कागदपत्रे आणि पुरावे आठवले यांना दाखवले. त्यानंतर आठवले यांनी वानखेडे कुटुंबीयांना पाठिंबा दर्शवला. नवाब मलिक करत असलेले आरोप चुकीचे असून आपण वानखेडे कुटुंबीयांच्या पाठीशी असल्याचे आठवले म्हणाले. क्लिक करा आणि वाचा- तसेच आज राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांनी समीर वानखेडे यांच्या निवासस्थानाला भेट दिली. या भेटीदरम्यान हलदर यांनीही ज्ञानदेव वानखेडे यांची सर्व कागदपत्रे पाहिली. यावेळी आपल्याला त्रास दिला जात असून आपल्या कुटुंबाला दररोज बेइज्जत केले जात असल्याची तक्रार समीर वानखेडे यांनी हलदर यांच्याकडे केली आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3BwrV0i
No comments:
Post a Comment