Breaking

Monday, October 4, 2021

'पोलिसांनी शिवसैनिकांना लाथांनी तुडवले; अपमान सहन झाला नाही म्हणूनच...' https://ift.tt/3otU8ly

नांदेड: शिवसेनेला जय महाराष्ट्र करून भाजपमध्ये प्रवेश करणारे माजी आमदार यांनी आज पुन्हा एकदा नांदेडचे पालकमंत्री यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. सोडतानाही साबणे यांनी चव्हाण यांना लक्ष्य केले होते. त्यावेळी त्यांना हुंदका आवरला नव्हता. ( ) पोटनिवडणुकीसाठी भाजपच्यावतीने शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे साबणे यांनी भाजपात अधिकृत प्रवेश करण्याआधीच त्यांना उमेदवारी देण्याचे निश्चित करण्यात आले होते. या घडामोडींनंतर आज सुभाष साबणे यांच्या औपचारिक स्वागतासाठी देगलूर येथे पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. भाजप प्रदेशाध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा झाला. या मेळाव्यात बोलताना साबणे यांनी अशोक चव्हाण यांच्या नावाचा उल्लेख टाळत निशाणा साधला. वाचा: 'महाविकास आघाडीच्या पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले म्हणून पोलिसांकडून शिवसैनिकांना लाथांनी तुडविण्यात आले. शिवसैनिकांचा अपमान करण्यात आला. हे आपल्याला सहन झाले नाही. त्यामुळे अनेक शिवसैनिकांसह आपण भाजपामध्ये प्रवेश केला', असे सुभाष साबणे म्हणाले. भाजप हा पक्ष शिवसैनिकांसाठी मावशीसारखा आहे. राज्यात भाजपा शिवसेना युतीचे सरकार असताना शेतकऱ्यांना वेगवेगळ्या स्वरूपाची मदत मिळाली. मतदारसंघात रस्त्यांची कामे झाली. पण गेल्या दोन वर्षांत शेतकऱ्यांना मदत मिळत नाही आणि विम्याचेही पैसे मिळत नाहीत. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठीही पालकमंत्री येत नाहीत, असा आरोपही साबणे यांनी केला. पोटनिवडणूक भाजपच जिंकेल: पाटील भारतीय जनता पार्टी देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणूक जिंकेल आणि विश्वासघाताने सत्तेवर आलेल्या राज्यातील महाविकास आघाडीला दाखवून देईल की, तुम्ही कितीही पक्ष एकत्र आलात तरी भाजपा, रिपब्लिकन पार्टी, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम, रयत क्रांती संघटना आणि जनसुराज्य मिळून आम्ही विजयी होऊ. या मतदारसंघातील भाजपाच्या विजयाने राज्यातील राजकीय परिवर्तनाचा वेग वाढेल, असा विश्वास यावेळी चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. निवडणूक आचारसंहितेचे कारण न दाखवता मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करा, अशी मागणीही त्यांनी राज्य सरकारकडे केली. वाचा:


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2Yp9RHV

No comments:

Post a Comment