मुंबई : क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील फरार साक्षीदार के.पी गोसावीचा सुरक्षारक्षक प्रभाकर साईल याने चौकशीदरम्यान धक्कादायक खुलासा केल्याने या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीचे प्रादेशिक संचालक (NCB ) यांच्यावर प्रभाकर साईल याने खळबळजनक आरोप केले आहेत. या पार्श्वभूमीवर आता समीर वानखेडे यांनी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांना एक पत्र लिहीत आपल्यावर कारवाई न करण्याची विनंती केली आहे. 'मला ड्रग्ज प्रकरणात अडवण्याचा प्रयत्न काही अज्ञात व्यक्तींकडून सुरू आहे. हे प्रकरण माझ्या वरिष्ठांकडे आहे, मात्र काही लोकांकडून मला तुरुंगात टाकण्याच्या आणि नोकरीवरून काढून टाकण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे माझ्यावर कोणतीही कारवाई करण्यात येऊ नये,' असं समीर वानखेडे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. प्रभाकर साईलचे वानखेडेंवर आरोप के. सी गोसावी याचा सुरक्षारक्षक प्रभाकर साईल याने एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. 'समीर वानखेडे यांनी पंचनाम्यावर साक्षीदार म्हणून आपली सही कोऱ्या कागदांवर घेतली. नऊ ते दहा कागदांवर माझ्या सह्या घेतल्या गेल्या. तसंच या ड्रग्ज प्रकरणात पैशांची डीलही झाली आहे,' असा आरोप साईल याने केला आहे. दरम्यान, प्रभाकर साईल याने केलेल्या आरोपांवर समीर वानखेडे यांनी मी वेळ आल्यानंतर उत्तर देईन, असं म्हटलं आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3m6b8wC
No comments:
Post a Comment