दुबई : पाकिस्तानने मंगळवारी न्यूझीलंडवर पाच विकेट्स राखून सहजपणे विजय मिळवला. पण या विजयाचा फायदा आता भारतीय संघाला झाल्याचे पाहायला मिळत आहे. पाकिस्तानने हा विजय साकारत भारताला मदत केली आहे. कारण पाकिस्तानच्या या विजयामुळे भारताचा उपांत्य फेरीचा मार्ग मोकळा होण्यासाठी मदत होऊ शकते. नेमकं घडलंय तरी काय, पाहा...पाकिस्तानने विजय साकारत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. दुसरीकडे न्यूझीलंडचा पराभव झाला, हे भारताच्या पथ्यावर पडले आहे. कारण न्यूझीलंडने आजच्या सामन्याच विजय मिळवला असता तर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांसाठी उपांत्य फेरीचा मार्ग खडतर बनला असता. पण न्यूझीलंडच्या या पराभवामुळे भारताला फायदा झाला आहे. आता भारताने न्यूझीलंडचा पराभव केला तर त्यांच्यासाठी उपांत्य फेरीत सहजपणे जागा मिळवता येऊ शकते. कारण या पराभवानंतर भारत आणि न्यूझीलंड एकाच स्तरावर गुणतालिकेत पाहायला मिळतील. या विश्वचषकात १२ संघ असून ते ६-६ देशांमध्ये दोन गटात विभागले गेले आहेत. विश्वचषकाच्या 'ब' गटामध्ये भारत आणि पाकिस्तान हे संघ आहेत. त्याचबरोबर न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानसारखे कधीही धक्का देणारे संघ आहे. एकूण सहा देशांच्या या गटामधून दोन संघच उपांत्य फेरीत पोहोचणार आहेत. त्यामुळे आता भारताने रविवारी होणाऱ्या सामन्यात न्यूझीलंडचा पराभव केला तर त्यांच्यासाठी उपांत्य फेरीचा दरवाजा खुला होण्यासाठी मोठी मदत मिळू शकते. कारण न्यूझीलंडने भारताविरुद्धचा सामना गमावला तर त्यांना उपांत्य फेरी गाठणे शक्य होईल, असे दिसत नाही. कारण एकिकडे पाकिस्तान आणि दुसरीकडे भारत उपांत्य फेरीचे प्रबळ जावेदार होतील आणि एका गटातून दोनच संघ उपांत्य फेरीत पोहोचू शकताात. हे दोन संघ भारत आणि पाकिस्तान असू शकतात. पण त्यासाठी आता भारताने रविवारी होणाऱ्या सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करणे सर्वात महत्वाचे आहे. जर भारताला न्यूझीलंडविरुद्धचा सामना गमवावा लागला तर त्यांचे या विश्वचषकातील आव्हान संपुष्टात येऊ शकते, असे चित्र दिसत आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3pEGCvP
No comments:
Post a Comment