Breaking

Saturday, October 30, 2021

मुंबई चार गाड्यांचा भीषण अपघात, एकामागोमाग धडकल्याने कांजुर मार्गवर वाहतूक कोंडी https://ift.tt/3w43Bls

मुंबई : ऐन दिवाळीच्या तोंडावर सध्या मुंबईत गर्दी पाहायला मिळते. अशात मुंबईतल्या कांजुर मार्ग भागात ब्रिजवर मोठा अपघात झाल्याची घटना समोर येत आहे. चार गाड्या एकमेकांना एका मागोमाग धडकल्यामुळे हा भीषण अपघात घडला. यामुळे वाहतूक कोंडी झाल्याचे समोर येत आहे. खरंतर, दिवाळीच्या तोंडावर मुंबईत मोठी वर्दळ असते. अशात अपघात झाल्यामुळे सुट्टीच्या दिवशी मुंबईत गर्दी पाहायला मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हीएलआर ब्रिब्रिजवर रात्री साडेअकराच्या सुमारास हा अपघात घडला. यामध्ये पाच ते सहा जण जखमी झाले असून त्यांना तातडीने महात्मा फुले या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, पोलीस आणि मदतकार्य घटनास्थळी दाखल झाले असून अपघाती वाहनांना रस्त्याच्याकडेला नेण्याचं काम सुरू आहे. तर वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी ही पोलिस काम करत असल्याचं सांगण्यात येत आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3CxHyFZ

No comments:

Post a Comment