करोनामुळे मागील दीड वर्षापासून बंद असलेल्या शाळांमध्ये अखेर आज, सोमवारी पहिली घंटा वाजली आहे. शहर तसेच ग्रामीण भागातील शाळांना दीर्घ प्रतीक्षेनंतर प्रारंभ झाला आहे. शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत करत आहेत. शाळांमधील या शिक्षणोत्सवाचे सर्व ताजे अपडेट्स आपण जाणून घेऊ... - मुंबईतील वांद्रे येथील पालिका शाळेत वर्ग भरले... - जोगेश्वरी येथील अस्मिता संचालित रामगोपाल केडीया विद्यालयाने सनई चौघडे,फुलांच्या पुष्पवृष्टीने मुलांचे स्वागत केले - ग्रामीण भागातल्या काही शाळांचे सत्र दुपारी सुरू होणार - पालकांच्या संमती असेल तरच विद्यार्थी शाळेत येणार आहेत... शाळांनी हे संमतीपत्र पालकांकडून घेतले आहे - औरंगाबाद येथील सेंट लॉरेन्स स्कूलमध्ये विद्यार्थी शाळेत प्रवेश करण्यापूर्वी हात निर्जंतुक करून घेण्यात येत होते... - प्रशासनाने प्रत्यक्ष वर्ग घेण्यासाठी सूचना दिल्या आहेत. त्यानुसार, शाळांनी तयारी केली आहे. साफसफाई, सॅनिटायजेशन, रंगरंगोटी इत्यादी कामेही पूर्ण करण्यात आली आहेत. दीड वर्षानंतर शिक्षक आणि विद्यार्थी एकत्र येणार असल्याने शाळेच्या पहिल्या दिवसानिमित्त उत्सुकता आहे. - करोनाची साथ आल्यानंतर मार्च २०२०पासून राज्यातील शाळा बंदच ठेवण्यात आल्या होत्या. सुरुवातीला शाळा पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्या आणि त्यानंतर ऑनलाइन स्वरूपात सुरू झाल्या होत्या. करोनाची पहिली आणि दुसरी लाट ओसरल्यानंतरही शाळा प्रत्यक्ष स्वरूपात सुरू होणार की नाही, याबाबत शंका होती. अखेर, ४ ऑक्टोबर रोजी शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. -
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3a0A6Xk
No comments:
Post a Comment