Breaking

Wednesday, October 6, 2021

Video: असा कॅच आजवर कोणीच घेतला नाही; पाहा ३८ वर्षीय खेळाडूने काय केले https://ift.tt/3mo7XiM

अबुधाबी: आयपीएल २०२१मधील ५२व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा सनरायझर्स हैदराबादने ४ धावांनी पराभव केला. आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. हैदराबादने २० षटकात ७ बाद १४१ धावा केल्या. उत्तरादाखल आरसीबीला २० षटकात ६ बाद १३८ धावा करता आल्या. आरसीबीने आधीच प्ले ऑफमध्ये स्थान निश्चित केले आहे तर हैदराबादचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून खुप आधी बाहेर पडला आहे. वाचा- हैदराबादच्या डावात आरसीबीचा गोलंदाज डॅनियल क्रिश्चनने एक सुपर कॅच घेतला ज्याची चर्चा सोशल मीडियावर जोरदार सुरू आहे. खराब सुरुवातीनंतर हैदराबादचा डाव जेसन रायने संभाळला. पण डॅनियलच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. १०९ किमी वेगाने टाकलेला चेंडू जेसनने तितक्याच वेगाने मारला होता. डॅनियलने चेंडू पकडताना कोणतीही चूक केली नाही. त्याने अचूक कॅच पकडला आणि सर्वांना धक्का दिला. वाचा- डॅनियलने कॅच घेतल्यानंतर फलंदाज आणि आरसीबीच्या खेळाडूंना काही क्षण समजले नाही नेमक काय झाले. अशा पद्धतीने विकेट गमावल्याने जेसन राय देखील निराश झाला. त्याने बॅट खाली टाकली. वाचा- वाचा- डॅनियलचा हा कॅच पाहिल्यानंतर प्रसिद्ध समालोचक हर्षा भोगले यांनी ट्विट करून हा कॅच या हंगामातील सर्वोत्तम कॅच ठरू शकले का असा प्रश्न विचारला. अनेक क्रिकेट चाहत्यांनी या कॅचचे कौतुक केले आहे. आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीच्या प्रतिक्रियेवरून समजू शकते की हा कॅच किती अवघड आणि धोकादायक होता. चेंडू पकडण्यात डॅनियलकडून थोडी जरी चूक झाली तर त्याला गंभीर दुखापत होण्याची शक्यता होती.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3iXqBNJ

No comments:

Post a Comment