Breaking

Wednesday, October 6, 2021

Video: 'त्या' रात्री गोसावी व भानुशाली NCB कार्यालयात परतही आले होते! https://ift.tt/2ZTPL92

मुंबई: क्रूझवर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने केलेली कारवाई फेक आहे. या कारवाईत एनसीबीचे अधिकारी म्हणून खासगी व्यक्तीही सहभागी झाल्या होत्या, असा दावा करत मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते यांनी खळबळ उडवून दिली आहे. स्वत:ला प्रायव्हेट डिटेक्टिव्ह म्हणवणारा आणि भाजप कार्यकर्ता या दोघांची नावे मलिक यांनी घेतली असून या दोघांच्या संशयास्पद हालचालींबाबतचे आणखी दोन नवे व्हिडिओ आता मलिक यांच्या अधिकृत ट्वीटर हँडलवर रात्री उशिरा पोस्ट करण्यात आले आहेत. ( ) वाचा: मुंबईजवळ क्रूझवर करण्यात आलेली कारवाई फेक आहे. या कारवाईत कोणतेही ड्रग्ज क्रूझवर आढळलेले नाही, असा दावा मंत्री नवाब मलिक यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन केला. या कारवाईत खासगी व्यक्ती एनसीबी टीमसोबत होत्या. किरण पी. गोसावी आणि मनीष भानुशाली अशी त्यांची नावे असून ते त्याठिकाणी काय करत होते, असा सवाल मलिक यांनी विचारला आहे. कारवाईवेळी गोसावी हा याला पकडून नेत असल्याचे तर मनीष भानुशाली हा याला पकडून नेत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. हा अधिकार या दोघांना कुणी दिला, असा सवालही मलिक यांनी केला आहे. गोसावी हा स्वत:ला प्रायव्हेट डिटेक्टिव्ह म्हणवतो. त्याच्यावर पुण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. तर भानुशाली हा भाजपचा कल्याणचा उपाध्यक्ष आहे, असा दावाही मलिक यांनी केला. मलिक यांचे हे सर्व आरोप एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह यांनी फेटाळले आहेत व हे दोघे पंच म्हणून हजर होते असे म्हटले आहे. त्यानंतर आता मलिक यांनी बुधवारी रात्री उशिरा गोसावी आणि भानुशालीचे दोन व्हिडिओ ट्वीट केले आहेत. वाचा: एनसीबीने क्रूझवर छापा टाकला त्याच रात्री गोसावी आणि भानुशाली हे परत एनसीबी कार्यालयात आले होते व काही वेळाने एनसीबी कार्यालायातून निघाल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. एकाच इनोव्हा गाडीतून ( एमएच १२ जेजी ३०००) हे दोघे आले. कार्यालयात जात असताना दरवाजात त्यांना विचारणा करण्यात आली. त्यानंतर लगेचच त्यांना आत सोडले गेल्याचेही व्हिडिओत दिसत आहे. तिथे उपस्थित माध्यमांनी हे व्हिडिओ टिपले आहेत. इतक्या रात्री आपल्याला एनसीबीने का बोलावले होते, अशी विचारणा माध्यम प्रतिनिधींनी केली मात्र त्यावर कोणतीही प्रतिक्रिया न देता ते तिथून निघाले. वाचा:


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3aeIsuM

No comments:

Post a Comment