Breaking

Tuesday, November 2, 2021

शाळेत जात असताना पळवून नेत १६ वर्षीय मुलीवर अत्याचार! https://ift.tt/2Y9Ykfz

: शाळेत जात असताना फुस लावून पळवून नेऊन आणि नंतर जिवे मारण्याच्या धमक्या देत जिल्ह्यातील १६ वर्षीय मुलीवर डोंगर परिसरात लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी आरोपी शिवाजी अप्पासाहेब काकडे याला सोमवारी अटक करुन मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता, आरोपीला बुधवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. भिष्मा यांनी दिले. या प्रकरणी पीडित मुलीच्या ४० वर्षीय आईने फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, ३० ऑक्टोबर २०२१ रोजी फिर्यादी, तिचा पती व १८ वर्षीय मुलगा हे कामानिमित्त बाहेर गेले होते, तर त्यांची १६ वर्षांची मुलगी शाळेत जाते म्हणून घराबाहेर पडली. दुपारी फिर्यादी व कुटुंबीय घरी परतले तेव्हा मुलगी शाळेतून परत आली नसल्याचं स्पष्ट झालं. शोधाशोध करूनही ती सापडली नसल्याने गावातील आरोपी शिवाजी अप्पासाहेब काकडे (२३) याने तिला फुस लावून पळवून नेल्याची शंका कुटुंबियांना आली. या प्रकरणात फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरुन करमाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तपासादरम्यान दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यावेळी, शाळेत जात असताना आरोपीने तिचा हात पकडून डोंगर परिसरात नेले आणि तिथे तिला जिवे मारण्याच्या धमक्या देत तिच्यावर अत्याचार केल्याचं मुलीने पोलिसांना सांगितलं. त्यानंतर घाटीमध्ये तिची वैद्यकीय तपासणी होऊन तिचा जबाब नोंदवण्यात आला. पोलिसांनी आरोपीला अटक करुन न्यायालयात हजर केले असता, आरोपीने पीडितेवर कुठे अत्याचार केला, आरोपीचे आणखी कुणी साथीदार आहेत का, अशा बाबींचा तपास करणे व पुरावे हस्तगत करणे बाकी असल्याने आरोपीला पोलीस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील अरविंद बागूल यांनी न्यायालयात केली. ही विनंती मान्य करुन न्यायालयाने आरोपीला बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3CI6fj7

No comments:

Post a Comment