म. टा. विशेष प्रतिनिधी, शिवसेना नेते यांच्या सदस्यत्वाची मुदत संपत आल्याने आता या जागेवर उमेदवारी कोणाला देणार, याविषयी शिवसेनेमध्ये उत्सुकता असताना आता या उमेदवारीची माळ शिवसेनेचे माजी आमदार यांच्या गळ्यात पडणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. पर्यावरण मंत्री यांच्यासाठी वरळी विधानसभा मतदारसंघाची जागा सोडणाऱ्या सुनिल शिंदे यांचे विधान परिषदेत पुनर्वसन करण्यात येणार असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते. स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या सहा जागांसाठी येत्या १० डिसेंबरला होणार आहे. या सहा जागांमध्ये मुंबईतील दोन जागांचा समावेश असून त्यापैकी एक जागा शिवसेनेकडे आहे. गेल्यावेळी शिवसेना नेते रामदास कदम यांना या जागेवरून शिवसेनेने विधान परिषदेवर पाठवले होते. ही जागा आपल्याला पुन्हा मिळावी अशी कदम यांची अपेक्षा असली तरी त्यांना विधान परिषदेवर न पाठवण्याचा निर्णय शिवसेनेने घेतल्याचे समजते. कदम यांची मध्यंतरी एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. कदम यांनीच भाजप नेते किरीट सोमय्या यांना परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधातील पुरावे दिल्याचा उल्लेख या क्लिपमध्ये असल्याची चर्चा रंगली होती. या पार्श्वभूमीवर कदम यांचा विधान परिषदेतून पत्ता कट करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या जागेवर कोणाला पाठवले जाणार याची चर्चा रंगलेली असतानाच सुनिल शिंदे यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचे समजते. वाचा:
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3DCVBdR
No comments:
Post a Comment