Breaking

Monday, November 1, 2021

प्रियांका गांधींना रात्रीच्या वेळी अटक; यूपीच्या 'त्या' पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल https://ift.tt/2ZDw5pU

नवी दिल्लीः उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरीमध्ये हिंसाचार झाला. या घटनेतील पीडित कुटुंबांना भेटण्यासाठी निघालेल्या काँग्रेस सरचिटणीस यांना रोखणं पोलिसांच्या अंगलट आलं आहे. प्रियांका गांधींना अडवलं आणि कुठल्याही वॉरंट शिवाय अटक केली, त्या पोलिसांविरोधात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी राजस्थानच्या बूंदीमधील काँग्रेस कार्यकर्ता चर्मेश शर्मा यांनी ६ ऑक्टोबरला राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत आयोगाने ३१ ऑक्टोबरला गुन्हा दाखल केला आहे. यूपी पोलिसांनी सुप्रीम कोर्ट आणि राज्यघटनेने महिलांना दिलेल्या सर्व विशेष हक्कांचं उल्लंघन केलं आहे. कलम ४६ नुसार कुठल्याही महिलेला पोलीस संध्याकाळनंतर आणि सूर्योदयापूर्वी अटक करू शकत नाही आणि ताब्यातही घेऊ शकत नाही. काही विशेष कारणांमुळे अटक करावीच लागली तर कोर्टाचे वॉरंट बंधनकारक आहे. तरीही प्रियांका गांधी यांना कुठल्याही वॉरंट शिवाय रात्रीच्या वेळी अटक करण्यात आली, असं तक्रारदार काँग्रेस कार्यकर्ते चर्मेश शर्मा यांनी म्हटलं आहे. प्रियांका गांधी पीडित कुटुंबांना भेटण्यासाठी निघाल्या होत्या उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी जिल्ह्यात गेल्या महिन्यात ३ ऑक्टोबरला हिंसाचार झाला. यानंतर काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी या पीडित कुटुंबीयांना भेटण्यासाठी निघाल्या होत्या. पण त्या भागात जमावबंदी लागू असल्याने उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना रोखलं. त्यांना ३० तास पोलिसांनी ताब्यात ठेवल्यानंतर अटक केली. या अटकेचा काँग्रेस कार्यकर्त्यांनी ठिकठीकाणी निषेधही केला.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3byoX0A

No comments:

Post a Comment