Breaking

Monday, November 22, 2021

खडसेंनी त्यांच्या मतदारसंघाकडे लक्ष द्यावे; गिरीश महाजन यांचा टोला https://ift.tt/2ZgetAG

म. टा. प्रतिनिधी, जळगाव जळगाव जिल्हा बँक निवडणुकीवर आम्ही बहिष्कार टाकला. त्यामुळे आमचा परावभव होण्याच्या प्रश्नच येत नाही. पराभवाच्या भीतीने आम्ही बहिष्कार टाकला असे म्हणणाऱ्या यांनी आपल्या मतदारसंघावर लक्ष केंद्रित करावे, अशा शब्दात भाजप नेते यांनी खडसेंना आज टोला लगावला आहे. (bjp leader criticizes ncp leader ) जळगाव जिल्हा बँक निवडणुकीच्या विषयासंदर्भात खडसेंनी या निवडणुकीपासून भाजपने पळ काढल्याचा आरोप केला होता. त्या आरोपांना उत्तर देताना गिरीश महाजन यांनी खडसेंवर जोरदार टीका केली. महाजन म्हणाले, की ‍भाजप हा घाबरणारा पक्ष नाही. एकनाथ खडसे यांनी आपला विधानसभा मतदारसंघ सांभाळावा. कोथळी ग्रामपंचायतीत आपला सरपंच, मुक्ताईनगर पालिकेत नगराध्यक्ष तरी आपला आहे का ? हे जरा तपासून पाहवे. राहीला विषय भाजपाची ताकद पहाण्याचा तर ताकद पाहयची असेल तर जनतेत यावे. जिल परिषद, पंचायत समिती निवडणुकांचे घोडामैदान अजून पुढे आहे, तेथे आमची ताकद दाखवितो अशा शब्दात आमदार गिरीश महाजन यांनी खडसेंना थेट आव्हान दिले. बँकेत अधिकाऱ्यांवर दडपण आणून विजय राज्य सरकार पोलिसांना हाताशी धरून दंगली घडवत असल्याचा गंभीर आरोप माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी केला. तसेच जिल्हा बँक निवडणुकीत अधिकाऱ्यांवर दडपण आणून विजय मिळविला असल्याचा आरोप सुध्दा गिरीश महाजनांनी केला.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3nGiqb5

No comments:

Post a Comment