मुंबई: 'यंदाची सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, समाधान, आनंद, उत्तम आरोग्य घेऊन येवो. दिवाळीतील दिव्यांच्या रोषणाईने अंध:कार दूर होऊन सर्वांचे जीवन प्रकाशमय होवो. यंदाची दिवाळी राज्याला करोनामुक्तीकडे नेणारी ठरो', अशा शब्दात उपमुख्यमंत्री यांनी राज्यातील जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ( ) वाचा: अजित पवार दिवाळीच्या शुभेच्छा देताना म्हणाले की, दिवाळी हा दिव्यांच्या रोषणाईचा, प्रकाशाचा, सर्वांना सोबत घेऊन आनंद साजरा करण्याचा सण. दिवाळीतील दिव्यांच्या प्रकाशानं आपल्या सर्वांच्या जीवनातील अज्ञान, अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी परंपरांचा अंध:कार दूर होवो. राज्यातल्या प्रत्येक घरात धन-धान्य, सुख-शांती, उत्तम आरोग्याची समृद्धी येवो. दिवाळी साजरी करत असताना समाजातील गरीब, वंचित, दुर्बल बांधवांना आनंदात सहभागी करून घेण्याची परंपरा आपण यंदाही कायम ठेवूया. वाचा: व प्रदुषण प्रतिबंधक नियमांचं पालन करून साजरी करूया, असं आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. गेल्या दिवाळीत कोविडची स्थिती गंभीर होती. त्यामुळे अनेक निर्बंधही लादण्यात आले होते. त्या तुलनेत यंदाच्या दिवाळीत निर्बंधांतून बऱ्यापैकी मुक्ती मिळालेली आहे. कोविडची साथही सध्या नियंत्रणात आहे. तोच धागा पकडत यंदाची दिवाळी राज्याला करोनामुक्तीकडे नेणारी ठरो, अशा भावना अजित पवार यांनी व्यक्त केल्या आहेत. वाचा:
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2YdtqD3
No comments:
Post a Comment