Breaking

Sunday, November 21, 2021

संप अधिक तीव्र होणार?; कामावर रुजू झालेले ३, १७१ कर्मचारी पुन्हा संपात https://ift.tt/3cAskol

म. टा. प्रतिनिधी, कामावर रुजू झालेले एसटी कर्मचारी मोठ्या संख्येने संपात उतरले असून रविवारी ३,१७१ कर्मचारी पुन्हा संपात सहभागी झाल्याचे स्पष्ट झाले. यामुळे संपात सहभागी असणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या ८८,१२२ झाली आहे. संपकऱ्यांवर शक्य ती कारवाई करत वाहतूक सुरू करण्याचे प्रयत्न महामंडळाकडून सुरू आहेत. मात्र या प्रयत्नांना अद्याप यश आले नाही. दरम्यान, रविवारी दुपारपर्यंत १४ प्रशिक्षणार्थी कामगारांना नियुक्तीपत्र देत महामंडळाने कामावर हजर करून घेतले. कामगारांच्या विलीनीकरणाऱ्या मागणीसाठी सकारात्मक असताना महामंडळाकडून मात्र एसटी संप चिरडून टाकण्याचे उपाय सुरूच आहेत, असा आरोप आझाद मैदानात बसलेल्या कर्मचाऱ्यांनी केला आहे. या निषेधार्थ चालक-वाहकांसह कार्यशाळा आणि प्रशासकीय प्रवर्गातील एकूण ३,१७१ कर्मचारी पुन्हा संपात दाखल झाले. 'चलो मुंबई'चा नारा देत आझाद मैदानात आंदोलक जमा होत आहेत. महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार रविवारी कामावर हजर झालेल्या कर्मचाऱ्यांची संख्या ४,१४४ असून संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांची संख्या ८८,१२२ आहे. शनिवारी हजर कर्मचाऱ्यांची संख्या ७.३१५ आणि संपात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या ८४,९५१ होती. राज्यात १४ प्रशिक्षणार्थी कामगारांना नियुक्तीपत्र देत महामंडळाने १४ बस रस्त्यावर उतरवल्या. मात्र यातून अवघ्या ४० प्रवाशांनी प्रवास केला. शिवशाही-शिवनेरीच्या १६७ कंत्राटी बसच्या माध्यमातून ४,६१९ प्रवाशांनी प्रवास केल्याचे महामंडळाने सांगितले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2Z8yQj2

No comments:

Post a Comment