मुंबई: राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते यांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे मुंबई विभागीय संचालक यांच्यावर हल्ला करण्यासाठी आता नवी वेळ निवडली आहे. गेले काही दिवस रोज सकाळी पत्रकार परिषदा घेऊन आरोपांच्या फैरी झाडणाऱ्या मलिक यांनी आता मध्यरात्रीची वेळ साधत समीर वानखेडे यांचा एक जुना फोटो ट्वीट केला असून त्यासोबत वानखेडे यांना सवालही केला आहे. दरम्यान, मलिक यांच्या कन्या आणि यांनी कालच वानखेडे यांच्या पहिल्या लग्नाशी संबंधित विवाहाचा दाखला आणि लग्नाच्या स्वागत सोहळ्याची निमंत्रण पत्रिका पोस्ट केली होती. ( ) वाचा: नवाब मलिक हे सध्या दुबई दौऱ्यावर गेले आहेत. हा त्यांचा शासकीय दौरा आहे. तिथे गेल्यावरही समीर वानखेडे यांच्यावरील त्यांचे हल्ले थांबलेले नाहीत. मलिक यांनी मध्यरात्रीनंतर ट्वीटरवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये समीर वानखेडे आणि एक अन्य व्यक्ती दिसत आहे. वानखेडे यांच्या निकाहच्या वेळचा हा फोटो असल्याचे दिसत आहे. मात्र त्याबाबत फोड न करता मलिक यांनी फोटोवरूनच सवाल केला आहे. 'कबूल है, कबूल है, कबूल है...यह क्या किया तुने Sameer Dawood Wankhede ?' असे प्रश्नार्थक ट्वीट या फोटोसह मलिक यांनी केले आहे. या फोटोवर मलिक हे सोमवारी अधिक स्पष्टीकरण देतील, अशी शक्यता असून त्यावर वानखेडे हे कोणते म्हणणे मांडतात हेसुद्धा महत्त्वाचे ठरणार आहे. वाचा: दरम्यान, समीर वानखेडे हे जन्माने मुस्लिम आहेत आणि त्यांनी बोगस जात प्रमाणपत्र सादर करून मागासवर्गीयांच्या आरक्षणात घुसखोरी केली व सरकारी नोकरी मिळवली, असा मलिक यांचा दावा आहे. हा वाद मुंबई हायकोर्टात गेला आहे. वानखेडे यांचे वडील यांनी मलिक यांच्याविरोधात सव्वा कोटीचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. तिथे मलिक यांनी आपल्याकडील पुरावे सादर केले आहेत. त्याशिवाय मुंबई महापालिकेने एक प्रतिज्ञापत्र सादर केले असून पालिकेकडील नोंदीनुसार वानखेडे यांचे नाव समीर दाऊद वानखेडे आणि धर्म मुस्लिम असल्याचे नमूद केले आहे. या दाव्यावर कोर्ट आजच आपला निकाल देणार आहे. वाचा:
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3xbPFXa
No comments:
Post a Comment