Breaking

Sunday, November 14, 2021

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन https://ift.tt/3cskY6x

पुणेः शिवशाहीर यांचे आज पुण्यात निधन झाले. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात बाबासाहेब पुरंदरेंवर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. ते १०० वर्षांचे होते. बाबासाहेबांच्या निधनानं संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. गेल्या तीन दिवसांपासून बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती खालावली होती. न्यूमोनियाचा संसर्ग झाल्यानं त्यांना पुण्यातील दिनानाथ रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान आज सकाळी ५ वाजून ७ मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे पार्थिव पर्वती येथील त्यांच्या घरी सकाळी आठ वाजता अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून दुपारी बारा नंतर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3oseMRs

No comments:

Post a Comment