नागपूर: मेडिकल कॉलेज हॉस्पिटल परिसरात युवकाने विद्यार्थिनीवर पिस्तूल रोखली. युवकाने गोळीबाराचा प्रयत्न केला मात्र पिस्तूल जाम झाल्याने गोळी चालली नाही. ही थरारक घटना सोमवारी सायंकाळी मेडिकलमधील ग्रंथालयाजवळ घडली. या घटनेने मेडिकल प्रशासन व विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. विक्की रा. खापरखेडा, असे युवकाचे नाव आहे. क्लिक करा आणि वाचा- मिळालेल्या माहितीनुसार, स्वातीची (बदललेले नाव) चार महिन्यांपूर्वी विक्कीसोबत ओळख झाली. दोघांमध्ये मैत्री झाली. गत काही दिवसांपासून स्वातीने विक्की सोबत बोलणे बंद केले. त्यामुळे विक्की संतापला. सोमवारी सायंकाळी तो मेडिकलमध्ये आला. त्याने स्वातीचा शोध घ्यायला सुरुवात केली. ग्रंथालयाजवळ त्याला स्वाती दिसले. त्याने स्वातीवर पिस्तूल रोखली. गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. मात्र पिस्तूल जाम झाल्याने गोळीबार झाला नाही. परिसरातील सुरक्षा रक्षकाने स्वातीच्या बचावासाठी धाव घेतली. संधी साधून विक्की तेथून पसार झाला. क्लिक करा आणि वाचा- या घटनेने मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात खळबळ उडाली. विद्यार्थिनीवर गोळीबार झाल्याचे वृत्त शहरात पसरले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा प्रचंड ताफा तेथे पोहोचला. पोलिस स्वातीला घेऊन अजनी पोलिस स्टेशनमध्ये आणले. वृत्त लिहिपर्यंत पोलिस तिचे बयाण घेत होते. क्लिक करा आणि वाचा-
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2ZaXKP2
No comments:
Post a Comment