Breaking

Tuesday, November 23, 2021

केंद्र क्रिप्टोकरन्सींवर विधेयक आणणार; बंदीच्या वृत्ताने क्रिप्टोकरन्सीत घसरण https://ift.tt/3DNwg18

नवी दिल्लीः केंद्र सरकारने क्रिप्टोकरन्सींवर आळा घालण्याची तयारी केली आहे. यासाठी २९ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात सरकार संसदेत क्रिप्टोकरन्सीचे नियमन करण्यासाठी विधेयक मांडणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विधेयकात सर्व प्रकारच्या खासगी क्रिप्टोकरन्सीवर बंदी घालण्याची तरतूद आहे. सरकार क्रिप्टो चलन तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठी काही शिथिलता देखील देऊ शकते. त्याच वेळी, विधेयकाच्या मदतीने, भारतीय रिझर्व्ह बँकेला अधिकृत डिजिटल चलन जारी करण्यासाठी एक सोयीस्कर फ्रेमवर्क मिळेल. क्रिप्टोकरन्सी आणि रेग्युलेशन ऑफ ऑफिशियल डिजिटल करन्सी विधेयक, 2021 यासह एकूण २६ विधेयके हिवाळी अधिवेशनात मांडली जातील. क्रिप्टोकरन्सीवर बंदी घालण्याच्या बातम्या समोर आल्यानंतर बिटकॉइन, इथरियमसह इतर क्रिप्टोच्या किमतीत मोठी घट झाली आहे. गेल्या २४ तासांत बिटकॉइनने 48,38,433 चा उच्चांक आणि 33,23,100 चा नीचांक गाठला. मात्र, आता त्यात पुन्हा रिकव्हरी होताना दिसत आहे. क्रिप्टोवर सध्या कोणतेही नियमन नाही देशात सध्या क्रिप्टोकरन्सीवर कोणतेही नियमन नाही. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्रिप्टोकरन्सीबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आणि नियामक पावले उचलण्याचे संकेत दिले. क्रिप्टोकरन्सीबाबत नियमन नसल्यामुळे त्याचा वापर टेरर फंडिंग आणि काळ्या पैशाच्या हालचालीसाठी केला जात आहे, असे सरकारचे मत आहे. क्रिप्टोला रोखता येणार नाही, परंतु त्याचे नियमन केले पाहिजे पंतप्रधान मोदींच्या बैठकीनंतर भाजप नेते जयंत सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली क्रिप्टोकरन्सीवरील संसदीय पॅनेलची पहिली बैठक झाली. क्रिप्टोकरन्सी थांबवता येणार नाही. परंतु त्यांचे नियमन केले पाहिजे, असे या बैठकीत एकमत झाले. क्रिप्टोकरन्सीने आर्थिक स्थिरतेवर चिंता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (आरबीआय) गव्हर्नर शक्तिकांत दास यांचे विधानही क्रिप्टोकरन्सीच्या आर्थिक स्थिरतेबाबत समोर आले. आरबीआय म्हणते की क्रिप्टोकरन्सीमध्ये मॅक्रो इकॉनॉमिक आणि आर्थिक स्थिरतेची चिंता आहे. तेव्हा या विषयावर सखोल चर्चा करणे आवश्यक आहे, असे शक्तिकांत दास एसबीआय कॉन्क्लेव्हमध्ये म्हणाले होते.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/30SqegU

No comments:

Post a Comment