Breaking

Monday, November 22, 2021

गडकरी-फडणवीसांच्या गडात काँग्रेसचं धक्कातंत्र!; पाहा नेमकं काय घडलं... https://ift.tt/3DUpnuI

मुंबई: मतदारसंघातील काँग्रेसचा उमेदवार अखेर निश्चित झाला आहे. काँग्रेसने नागपूरमध्ये यांना उमेदवारी दिली असून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शिक्कामोर्तब करताच सोमवारी रात्री उशिरा भोयर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. ( ) वाचा: काँग्रेसच्या वतीने सोमवारी सर्वप्रथम कोल्हापूर आणि धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली. कोल्हापूरमधून सतेज पाटील यांना तर धुळे नंदूरबारमधून गौरव देवेंद्रलाल वाणी यांना पक्षाने उमेदवारी दिली. हे दोन उमेदवार जाहीर केले असताना काँग्रेसने नागपूरच्या उमेदवाराचे नाव मात्र गुलदस्त्यात ठेवले होते. हे नाव रात्री उशिरा जाहीर करण्यात आले. सोमवारीच भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश करणारे नागपूरमधील ज्येष्ठ नगरसेवक डॉ. छोटू अर्थात यांना काँग्रेसने उमेदवारी दिली. त्यामुळे नागपूर मतदारसंघातील लढत चुरशीची होणार असल्याचे दिसत आहे. नागपूरमध्ये भाजपने माजी ऊर्जामंत्री यांना उमेदवारी दिली असून भाजपमधून काँग्रेसमध्ये गेलेल्या भोयर यांच्याशीच बावनकुळे यांना लढत द्यावी लागणार, हे आता स्पष्ट झाले आहे. वाचा: बावनकुळे अर्ज भरत असतानाच भोयर यांचा काँग्रेस प्रवेश राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेले व साडेतीन दशकाहून अधिक काळ भाजपमध्ये सक्रिय राहिलेले नगरसेवक डॉ. रवींद्र भोयर यांनी सोमवारी दिग्गज काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत काँग्रेसचा झेंडा हातात घेतला. संघ मुख्यालयाजवळ असणाऱ्या देवडिया भवनात झालेल्या या कार्यक्रमात पक्षाने यानिमित्ताने छोटेखानी शक्तिप्रदर्शन केले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी मुख्यमंत्री यांच्या कर्मभूमीतील डॉ. भोयर या संघ स्वयंसेवकाने भाजपला केलेला रामराम, पक्षाला मोठा धक्का समजला जातो; तर काँग्रेसला बळ मिळाल्याचे बोलले जात आहे. डॉ. भोयर यांची नाराजी नेमकी कुणावर आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. विधान परिषदेच्या नागपूर जिल्हा स्थानिक स्वराज्य मतदारसंघात भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे हे सोमवारी अर्ज भरत असताना दुसरीकडे डॉ. भोयर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश सुरू होता. पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांच्यासह शहर व ग्रामीणमधील पदाधिकारी यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. भोयर यांच्या काँग्रेस प्रवेशाने नागपूरची विधानपरिषदेची लढत रंगतदार बनली आहे. वाचा:


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3r2H1ci

No comments:

Post a Comment