लातूरः राज्यात एकाचवेळी सक्तवसुली संचालनालयाकडून (ED)धाडसत्र सुरू आहे. राज्यातील महाविकास आघाडीचे नेतेही ईडीच्या रडारवर आहे. तर, भाजप नेते ()हे देखील महविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) नेत्यांवर गंभीर आरोप होत आहे. अशातच किरीट सोमय्यांनी केलेल्या एका ट्वीटमुळं चर्चेला उधाण आलं आहे. पुणेसह औरंगाबाद व लातूर जिल्ह्यातही ईडी छापेमारी करणार असल्याची चर्चा होत आहे. गेल्या दोन दिवसापासून लातुर शहरासह जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती बँक, मांजरा, विकास, रेणा साखर कारखान्यावर ईडीची धाड पडणार असल्याची चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी भाजपचे नेते किरीट सोमय्या हे लातूर दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख आणि त्यांच्या परिवाराने जिल्ह्यातील साखर कारखाने गिळंकृत केल्याची टीका केली होती. तसंच, ३१ डिसेंबरपूर्वी कारवाई सुरू झालेली असेल, असा सूचक इशाराही त्यांनी दिला होता. वाचाः किरीट सोमय्यांनी केलेल्या या सूचक वक्तव्यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँक, मांजरा, विकास, रेणा साखर कारखान्यावर ईडीची धाड पडणार असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू होती. मात्र, अद्याप अशी अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तसंच, ही अफवा असून राजकीय द्वेषापूर्वी ती जाणीवपूर्वक पसरवण्यात आली असल्याचंही बोललं जात आहे. वाचाः दरम्यान, भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी गुरुवारी एक ट्वीट केलं होतं. या ट्वीटमध्ये त्यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. भाजप, शेतकरी आणि काही कार्यकर्त्यांनी ठाकरे सरकारच्या तीन नेत्यांविरोधात दिवाळीच्या आधी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेऊन यंत्रणांनी तपास सुरू केला आहे. पुणे, औरंगाबाद, लातूर या जिल्ह्यात या नेत्यांच्या बेनामी संपत्तीवर छापेमारी सुरू झाली आहे, असं किरीट सोमय्या यांनी ट्वीट केलं आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3c4QCqn
No comments:
Post a Comment