मुंबई: या प्रकल्पामध्ये गेलेल्या घराच्या बदल्यात दुसऱ्या निवासस्थानाचे देकार पत्र देण्यासाठी प्रकल्पबाधिताकडून १ लाख २० हजार रुपयांची लाच घेणारे ' 'चे दोन अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ( एसीबी ) जाळ्यात अडकले आहेत. उपजिल्हाधिकारी आणि सहायक समाज विकास अधिकारी अशी या दोन लाचखोर अधिकाऱ्यांची नावे असून लाचेचे पैसे स्वीकारून त्यांना देणाऱ्या यालाही एसीबीने अटक केली. ( ) वाचा: विलेपार्ले पूर्वेकडील अली यावर जंग मार्गावरील राजाराम वाडी या ठिकाणी तक्रारदाराचे घर होते. सहार उन्नत मार्ग याच परिसरातून जात असल्याने एमएमआरडीएच्या वतीने तक्रारदाराची झोपडी जमीनदोस्त करण्यात आली. या बदल्यात या प्रकल्पबाधिताला कुर्ला पश्चिमेकडील एचडीआयएल येथील सदनिका देण्यात येणार होती. या सदनिकेचे देकार पत्र देण्यासाठी शहाजी जोशी यांनी संगिता टकले आणि स्वत:साठी दीड लाख रुपयांची मागणी केली. इतकी रक्कम देणे शक्य नसल्याने तडजोडीनंतर १ लाख २० हजार इतकी रक्कम निश्चित करण्यात आली. वाचा: घरासाठी लाच द्यायची नसल्याने प्रकल्पबाधिताने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) कडे तक्रार केली. त्याच्या तक्रारीची शहानिशा करून एसीबीच्या वतीने सापळा रचण्यात आला. टकले आणि जोशी यांच्यासाठी १ लाख २० हजार रुपये घेताना जगदीश पाटील याला पकडण्यात आले. ही रक्कम त्याने जोशी याला दिल्यानंतर ते देखील एसीबीच्या जाळ्यात अडकले. जोशी याने पैसे मिळाल्याचे संगिता टकले यांना कळविले आणि त्यावर त्यांनी देखील संमती दर्शवली. त्यामुळे टकले, जोशी आणि पाटील यांच्यावर एसीबीने गुन्हा दाखल केला असून चौकशी सुरू केली आहे. वाचा:
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3ntzdy9
No comments:
Post a Comment