Breaking

Friday, November 26, 2021

रत्नागिरी जिल्हयात 'या' मार्गांवर धावली सामान्यांची लालपरी; प्रवासी वर्गाला थोडा दिलासा https://ift.tt/3FTSrDc

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील एसटी कर्मचारी संपात फूट पडली असून जवळपास सगळ्याच तालुक्यात एसटी बसेस २६ नोव्हेंबर रोजी शुक्रवारी प्रवाशांना घेऊन यशस्वीरित्या मार्गस्थ झाल्या आहेत. गेले कित्येक दिवस प्रवासीवर्ग खाजगी वाहतुकीच्या आर्थिक पिळवणूकीने त्रस्त झाला आहे.या प्रवाशांना अल्पसा का होईना पण दिलासा मिळाला आहे. (st buses have started in almost all the talukas of ratnagiri district) चिपळूण आगारातून रत्नागिरी व पोफळी या महत्वाच्या मार्गांवर आज सामान्य प्रवाशांची लालपरी धावली आहे. जिल्हयात पुढील तालुक्यातील आगारात एसटी बसेस मार्गस्थ झाल्या आहेत. मंडणगड- २२, चिपळूण १७, खेड ११, दापोली १७, गुहागर २३, रत्नागिरी ११, देवरुख ०३ रत्नागिरी विभाग ११ ही माहिती रत्नागिरिचे प्रभारि विभाग नियंत्रक श्री.जगताप यांनी दिली. आज २६ नोव्हेंबर रोजी दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे, तर ८७ कर्मचाऱ्यांची सेवासमाप्ती करण्यात आली आहे. आजवर जिल्हयात एकूण ११० एसटी कर्मचारी निलंबित करण्यात आले आहेत. तर, आजवर एकूण ११८ कर्मचाऱ्यांची सेवासमाप्ती करण्यात आल्याची माहिती रत्नागिरी विभाग एसटी प्रशासनाकडून देण्यात आली आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3rh9cEq

No comments:

Post a Comment