Breaking

Saturday, November 20, 2021

वादात बाळासाहेब थोरात यांनीही घेतली उडी; विक्रम गोखलेंना लगावला टोला! https://ift.tt/3FxFz5z

अहमदनगर : अभिनेत्री हिने भारतीय स्वातंत्र्यलढ्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं आणि देशभर मोठा गदारोळ झाला. भारताला १९४७ साली मिळालेलं स्वातंत्र्य ही भीक होती आणि खरं स्वातंत्र्य हे २०१४ साली मिळालं, असं म्हणत कंगनाने अकलेचे तारे तोडले. कंगनाच्या या वक्तव्यावर चहुबाजूने टीका होत असताना ज्येष्ठ मराठी अभिनेते यांनी मात्र कंगनाच्या वक्तव्याचं समर्थन केलं. याच मुद्द्यावरून आता काँग्रेस नेते आणि राज्याचे महसूल मंत्री यांनी विक्रम गोखलेंवर निशाणा साधला आहे. () 'बेताल वक्तव्य करणाऱ्या कंगनाला ४० बॉडीगार्डची सुरक्षा आणि पद्मश्री हा पुरस्कार मिळतो, हे बघून विक्रम गोखले पुढे आले. त्यांनाही पद्मश्री व्हायचंय वाटतं,' असा टोला बाळासाहेब थोरात यांनी लगावला आहे. केंद्र सरकारने वादग्रस्त तीन कृषी कायदे मागे घेतल्याने अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील ताळेगाव येथे शेतकरी विजय दिवस साजरा करण्यात आला. यावेळी थोरात बोलत होते. 'ठराविक लोकांसाठी केंद्राकडून कायदे तयार करण्याचं काम सुरू आहे. देशात पेट्रोल-डिझेलचे दर वाढले असताना टाळ्या-थाळ्या वाजवणारे कुठे गेले? कंगणा राणावत काय बोलते? स्वातंत्र्याबद्दल बोलण्याचा तिला अधिकार आहे का?' असा प्रश्न उपस्थित करत बाळासाहेब थोरात यांनी अभिनेत्री कंगना राणावत हिच्यावर टीका केली आहे. 'वादग्रस्त बोलणाऱ्यांचं बोलणं सहज नसतं, कोणीतरी यामागे आहे,' असा आरोपही थोरात यांनी केला आहे. सर्व संत विचाराचा सार डॉ. बाबासाहेबांनी केला अन् राज्यघटना तयार केली. हे आज स्वातंत्र्यावर बोलत आहेत, उद्या राज्यघटनेवरही बोलतील. मात्र देश राज्यघटनेप्रमाणेच चालला पाहिजे हे सर्वांनी लक्षात ठेवावं, असंही बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3Fw9Qlt

No comments:

Post a Comment