Breaking

Tuesday, November 2, 2021

दिवाळीत मुंबईच्या हवेची गुणवत्ता यंदाही घसरली https://ift.tt/3k0KkfO

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईच्या दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीच्या काळात घसरलेली आहे. दिवाळीतील फटाके आणि सध्या हवेची बदललेली दिशा यामुळे हवेच्या गुणवत्तेवर परिणाम झाला असून मंगळवारी हवेचा दर्जा वाईट स्तराचा असल्याची नोंद झाली. मंगळवारी मुंबईच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक २६६ होता. हवेची गुणवत्ता पुढील तीन दिवसांसाठी खालावलेली राहील, असे सफर या हवेची गुणवत्ता नोंदणाऱ्या प्रणालीतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. मंगळवारी कुलाबा, माझगाव, वांद्रे-कुर्ला संकुल येथे हवेची गुणवत्ता खालावली होती. या तीनही ठिकाणी हवा अतीवाईट स्वरूपाची असल्याची नोंद झाली. कुलाबा येथे पीएम २.५चा निर्देशांक ३४६ होता, तर पीएम १०चा निर्देशांक २२० होता. माझगाव येथेही पीएम २.५चा निर्देशांक अतीवाईट अर्थात ३५६ नोंदला गेला आणि पीएम १०चा निर्देशांक वाईट अर्थात २३७ असा नोंदला गेला. वांद्रे-कुर्ला संकुल येथे पीएम २.५चा निर्देशांक ३१३ होता, तर पीएम १०चा निर्देशांक २२६ होता. चेंबूर, मालाड येथे हवेचा निर्देशांक पीएम २.५मुळे वाईट होता. दोन्ही ठिकाणी गुणवत्ता निर्देशांक २५०च्या पुढे होता. यासोबतच बोरिवली, भांडुप, अंधेरी आणि वरळी येथे हवेची गुणवत्ता मध्यम स्वरूपाची होती. या चारही ठिकाणी पीएम १० आणि पीएम २.५ या दोन्ही प्रदूषकांचा निर्देशांक १००हून अधिक होता. मुंबईसोबतच नवी मुंबई येथेही हवेची गुणवत्ता मध्यम स्वरूपाची नोंदली गेली. मुंबईमध्ये जमिनीवरून येणाऱ्या वाऱ्यांमुळे हवेत प्रदूषके साचून राहत आहेत. त्यामुळे हवेची गुणवत्ता खालावल्याचे सफरकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मुंबईतील हवेच्या गुणवत्तेसोबतच दिल्लीतही शेतीसाठी धान्यकापणीनंतर उरलेला पेंढा जाळण्यामुळे हवेवर विपरीत परिणाम झाला आहे. दिल्लीमध्ये हवेची गुणवत्ता अतीवाईट नोंदली जात आहे. मंगळवारी दिल्लीतील हवेचा गुणवत्ता निर्देशांक ३०९ नोंदला गेला. हा प्रभाव पुढील दोन दिवस तरी कायम राहील, असा अंदाज वर्तवला जात आहे. फटाक्यांमुळे अधिक बाधित येत्या काळात नरकचतुर्दशीची पहिली अंघोळ, लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडवा, भाऊबीज या काळात फुटणाऱ्या फटाक्यांमुळे हवेमध्ये आणखी दीर्घ काळ प्रदूषके साचून हवेची गुणवत्ता अधिक बाधित होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2YdJ952

No comments:

Post a Comment