Breaking

Friday, November 12, 2021

त्रिपुरातील कथित घटनेचे महाराष्ट्रात पडसाद; राऊत यांचा भाजपवर निशाणा https://ift.tt/3ktKw7G

मुंबई: त्रिपुरातील कथित घटेनेचे पडसाद महाराष्ट्रातील नांदेड, अमरावती आणि मालेगावमध्ये उमटले असून या तीन ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. या घटनांवर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत असून शिवसेनेचे नेते आणि खासदार यांनीही भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे. (shiv sena mp criticizes bjp over repercussions of the alleged incident in tripura in maharashtra) त्रिपुरात झालेल्या अन्यायाविरुद्ध महाराष्ट्रात पडसाद उमटण्याचे कारण नाही. तसेच महाराष्ट्रात दगडफेक करण्याचेही कारण नाही. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारच्या मनात सर्व समाज, धर्म, जातींबद्दल सद्भावना आहे, असे सांगत महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करुन ते काय साध्य करणार?, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. क्लिक करा आणि वाचा- त्रिपुरातील परिस्थितीबाबत आम्हालाही चिंता असल्याचे राऊत म्हणाले. त्रिपुरा आणि विशेषत: ईशान्येकडील सीमेवरील राज्यांमध्ये शांतता राहावी, असेच आम्हाला वाटते. तिथे कुठल्याही कारणामुळे अस्थिरता निर्माण होऊ नये, अशीच आमची भूमिका असल्याचे राऊत म्हणाले. मात्र, त्रिपुरातील घटनेचे पडसाद महाराष्ट्रात उमटणे योग्य नसल्याचे सांगत त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला. भाजपला देशभरात अशा प्रकारची अस्वस्थता निर्माण करुन आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत उतरायचे आहे, असा थेट गंभीर आरोपही राऊत यांनी केला. क्लिक करा आणि वाचा- कठोर कारवाई करा, गृहराज्यमंत्र्यांचे आदेश दरम्यान, राज्याचे गृह राज्यमंत्री शंभुराजे देसाई यांनी या राज्यात घडलेल्या घटनेवर भूमिक स्पष्ट केली आहे. सरकारने या घटनेची गांभिर्याने दखल घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे. काही समाजकंटक राज्यातील वातावरण बिघडवण्याचे काम करत असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश आपण पोलिसांना दिले असल्याचे ते म्हणाले. राज्यातील काही भागांमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाल्याचे कळताच पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्याचेही ते म्हणाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून समाजकंटकांवर कारवाईही सुरू करण्यात आल्याचे ते म्हणाले. क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3c6NSc3

No comments:

Post a Comment