दुबई : ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे पारंपरिक प्रतिस्पर्धी संघ रविवारी फायनलमध्ये एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. आतापर्यंत दोन्ही संघांचा विचार केला तर न्यूझीलंडपेक्षा ऑस्ट्रेलियाचेच पारडे भारी दिसत आहे. कारण यापूर्वी ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत बऱ्याचदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारून विजय मिळवला आहे, तेवढा अनुभव नक्कीच न्यूझीलंडच्या संघाकडे नाही. पण दुसरीकडे न्यूझीलंडच्या संघाला कमी लेखून चालणार नाही. कारण केन विल्यम्सनचा संघ शांतपणे शिकार करण्यात माहिर आहे. त्यामुळे न्यूझीलंडचा संघ फायनलमध्येही कांगारूंची शइकार करू शकतो. त्यामुळे न्यूझीलंडच्या संघाला कमी लेखण्याची चुक ऑस्ट्रेलियाने केली त त्यांना नक्कीच हा सामना गमवावा लागेल. आतापर्यंत दोनवेळा न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया हे विश्वचषकाच्या अंतिम फेरीत आमने-सामने आले आहेत. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया २०१५ साली झालेल्या वनडे विश्वचषकाच्या अंतिम फेरीत एकमेकांसमोर उभे ठाकले होते. या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाच्या संघाने न्यूझीलंडवर दणदणीत विजय साकारला होता. यापूर्वी न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया २०१९ साली झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफाच्या अंतिम फेरीतही आमने-सामने आले होते. त्यावेळीही ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडवर दमदार विजय मिळवला होता. त्यामुळे विश्वचषकाच्या फायनलचा विचार केला तर ऑस्ट्रेलियाचे पारडे नक्कीच न्यूझीलंडपेक्षा जड आहे. कारण विश्वचषकाच्या दोन्ही फायनल्समध्ये त्यांना ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला आहे. पण ही झाली आकडेवारी आणि आकडेवारी कधीच वर्तमानात काय होईल, हे सांगू शकत नाही. त्यामुळे वर्तमानात जगणारा न्यूझीलंडचा संघही ऑस्ट्रेलियावर मात करून विश्वचषक उंचावू शकतो. त्यासाठी न्यूझीलंडला एक गोष्ट नक्कीच करावी लागेल. न्यूझीलंडला आपल्या गुणवत्तेवर विश्वास ठेवावा लागेल. कारण या विश्वचषकातील त्यांच्या कामगिरीवर नजर टाकली तर त्यांनी ऑस्ट्रेलियापेक्षा चांगली कामगिरी केली आहे. त्याचबरोबर न्यूझीलंडने दिग्गज संघांना धक्का देत अंतिम फेरी गाठली आहे. त्यामुळे न्यूझीलंडच्या संघाला फक्त अत्मविश्वास वाढवण्याची गरज आहे. केन विल्यम्सनसारखा निष्णात कर्णधार न्यूझीलंडला भेटला आहे, त्यामुळे त्याच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडचा संघ फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला पराभूत करत विश्वचषकाला गवसणी घालणार का, याची उत्सुकता चाहत्यांना नक्कीच असेल.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3DfmZi4
No comments:
Post a Comment