Breaking

Monday, November 15, 2021

कंगना राणावतच्या स्वातंत्र्यावरील वक्तव्यावर नितीशकुमारांची प्रतिक्रिया; म्हणाले... https://ift.tt/3qAe3Am

पाटणाः बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतने स्वातंत्र्यावर केलेल्या वक्तव्यावरून राजकारण रंगलं आहे. आता बिहारचे मुख्यमंत्री यांनी तिच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. जनता दरबार संपल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना नितीशकुमार यांना प्रश्न विचारण्यात आला. याला काहीही अर्थ नाही. अशा लोकांची चर्चा कशी प्रसिद्ध होते, याचे आश्चर्य वाटते. या सर्व गोष्टींचे महत्त्व काय आहे, असं म्हणत नितीशकुमार यांनी कंगना राणावतसह माध्यमांना लक्ष्य केले. कोण काय म्हणेल त्याबद्दल आपण काही सांगू शकत नाही. अशा गोष्टींकडे कोणी लक्ष देते का? स्वातंत्र्य कधी मिळालं हे सर्वांना माहिती आहे. अशा वक्तव्ये महत्त्वाची नाही. चेष्टा सममजून सोडून द्यायला हवी होती. पण काही लोकांना सवय असते, आपण अशा लोकांकडे लक्ष देत नाही, असं नितीशकुमार म्हणाले. गांधीजी चंपारणमध्ये आल्यानंतर देशात स्वातंत्र्य चळवळ वेगाने वाढली आणि तीस वर्षांत देश स्वतंत्र झाला. बिहारमधील लोकांबद्दल गैरसमज निर्माण केले जातात. या सर्व गोष्टींबाबत बिहारमधील बहुतेक नागरिकांना चांगली कल्पना आहे. गडबड करणारे काही असतातच. प्रत्येक व्यक्ती योग्य असेल, हे जगात कोणीही सांगू शकत नाही. जगात कुठेही पाहा, प्रत्येक माणूस चांगला असू शकत नाही, असा टोला नितीशकुमार यांनी लगावला. राहुल गांधींवरन निशाणा राहुल गांधींच्या हिंदुत्वावरील वक्तव्यावरूनही त्यांनी टीका केली. 'या सगळ्या गोष्टींवर काय चर्चा करायची? काहींना काहीही बोलून चर्चेत राहायचे असते. त्यांना कामात रस नाही. आपल्याला जनतेच्या कामात रस आहे. जनतेची सेवा करणे हा आमचा धर्म आहे, आम्ही त्यात मग्न आहोत. आम्ही एखाद्या व्यक्तीच्या कृतीबद्दल बोलत नाही. प्रसिद्धी होत राहावी म्हणून काही तरी वक्तव्य करत राहणे हा बहुतेकांचा प्रयत्न असतो. बिहारमध्ये बघितले तर प्रसिद्धी मिळावी म्हणून काही लोक माझ्या विरोधात बोलतात. आपल्याविरोधात विरोधात बोललात तर प्रसिद्धी मिळेल हे त्यांना माहिती आहे, असे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार म्हणाले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3wQek3l

No comments:

Post a Comment