सिंधुदुर्ग: जिल्ह्यातील वेंगुर्ल्यातील समुद्रात पारंपारिक पद्धतीने मासेमारी करत असताना रापणीच्या जाळ्यात तीन मोठे मासे अडकले. मच्छीमारांनी डॉल्फिनना जाळ्यातून सुखरूप बाहेर काढून समुद्रात सोडून दिले. रापणीच्या जाळ्यात सापडलेल्या या डॉल्फिन माशांना पाहण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी समुद्रकिनाऱ्यावर गर्दी केली होती. गेल्याच आठवड्यात मालवणच्या चिवला समुद्र किनाऱ्यावर असेच डॉल्फिन जाळ्यात अडकले होते. मालवणमधील १० ते १२ छोटे, मोठे डॉल्फीन मच्छीमारांच्या जाळ्यात अडकले होते. हे डॉल्फिन मासे पाहण्यासाठी समुद्रकिनारी मोठी गर्दी झाली होती. (three big dolphins caught in fishermans nets in the sea of mochemad in ) क्लिक करा आणि वाचा- सिंधुदुर्गच्या समुद्रात हिवाळ्यात डॉल्फिन समुद्रात डुबक्या मारताना पाहायला मिळत आहेत. हे डॉल्फिन थव्याने फिरत असतात. डॉल्फिन दर्शन घेण्यासाठी पर्यटक होडीतून समुद्रात फेरफटका मारताना दिसत आहेत. सिंधुदुर्गात अलीकडे मालवण व येथे चक्क डॉल्फिनच जाळ्यात सापडले असल्याने डॉल्फिन पाहण्यासाठी समुद्रकिनारी गर्दी झाली झाली. क्लिक करा आणि वाचा- मोचेमाड येथील समुद्रात पारंपरिक 'रापण' पद्धतीची मासेमारी केली जाते. रोजच्याप्रमाणे श्री. समर्थ रापण संघाच्या मच्छीमारांनी सकाळी समुद्रात रापणीची जाळी टाकली व ती बऱ्याच वेळाने किनाऱ्यावरती ओढली असता त्यात तीन मोठे डॉल्फिन मासे आढळून आले. मच्छीमार बांधवांनी डॉल्फिन सुखरूप समुद्रात सोडून दिले. डॉल्फिन जाळ्यात अडकत असल्याने यामुळे मच्छीमारांचे नुकसान होत असल्याचे मच्छीमारांचे म्हणणे आहे. क्लिक करा आणि वाचा-
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/30ExkWm
No comments:
Post a Comment