Breaking

Thursday, November 18, 2021

भारतीय संघासाठी दुसऱ्या सामन्यापूर्वीच आली गूड न्यूज, विजयासह साकारू शकणार मालिकाविजय https://ift.tt/3wZRVAp

रांची : भारताचा न्यूझीलंडविरुद्धचा दुसरा आणि महत्वाचा ट्वेन्टी-२० रांचीमध्ये सामना होणार आहे. कारण या सामन्यात भारताने विजय मिळवला तर त्यांना मालिका जिंकता येणार आहे. पण हा सामना सुरु होण्यापूर्वीच भारतीय संघासाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे. भारताने रांचीमध्ये किती सामने जिंकले आहेत, पाहा...भारतासाठी रांचीचे मैदान चांगलेच लकी ठरले आहे. या मैदानात भारताने पहिला ट्वेन्टी-२० सामना हा श्रीलंकेविरुद्ध १२ फेब्रुवारी २०१६ साली खेळला होता. या सामन्यात भारताने श्रीलंकेवर ६९ धावांनी दणदणीत विजय मिळवला होता. भारताने या मैदानात दुसरा सामना विश्विजेत्या ऑस्ट्रेलियाच्या संघाबरोबर ७ ऑक्टोबर २०१७ साली खेळला होता. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला ९ विकेट्स राखून धुळ चारली होती. त्यामुळे आतापर्यंत झालेल्या दोन्ही सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला असून त्यांची विजयाची टक्केवारी ही १०० टक्के आहे. त्यामुळे याच रेकॉर्डनुसार भारतीय संघाने जर शुक्रवारचा सामना जिंकला तर त्यांना ही मालिकाही जिंकता येणार आहे. कारण या मालिकेतील जयपूर येथे झालेला सामना भारताने पाच विकेट्स राखून जिंकला होता. या विजयासह भारताने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे आता दुसरा सामना जिंकत भारतीय संघ मालिका आपल्या खिशात टाकणार का, याची उत्सुकता सर्वांनाच असेल. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील या मालिकेतील पहिला सामना चांगलाच रंगतदार झाला होता. या सामन्याची उत्सुकता अंति षटकापर्यंत पोहोचली होती. भारताच्या रिषभ पंतने यावेळी अखेरच्या षटकात चौकार लगावत भारताला विजय मिळवून दिला होता. न्यूझीलंडने या सामन्यात भारतापुढे १६५ धावांचे आव्हान विजयासाठी ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्माने ४८ धावांची दमदार खेळी साकारली होती, तर सूर्यकुमार यादवने तिसऱ्या स्थानावर येत धडाकेबाज अर्धशतक झळकावले होते. त्यामुळे भारताला हा विजय मिळवता आला. भारताने या विजयासह तीन ट्वेन्टी-२० सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतलेली आहे. त्यामुळे या लकी मैदानात भारतीय संघ विजय मिळवत मालिका जिंकणार का, याकडे सर्वांचे लक्ष असेल.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3x0lDW6

No comments:

Post a Comment