Breaking

Wednesday, December 1, 2021

क्रूझर गाडी पलटल्याने भीषण अपघात: ३ जागीच ठार; ६ जण जखमी https://ift.tt/31gY5AR

: चाळीसगाव तालुक्यातील हिरापूर गावाजवळ चारचाकी गाडी पलटल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जण ठार तर सहा जण जखमी झाले आहेत. बुधवारी रात्री १० वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. जखमींमधील तिघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. () नाना भास्कर कोळी, विकास जलाल तडवी व मुक्तार तडवी तिघे रा.डोंगरगाव अशी अपघात ठार झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. जखमींमध्ये विनोस तडवी (३५), चंदन हरीश पाटील (२७), माधान नारायण पाटील (३०),नितीन बाळू पाटील ( २६), दिलीप शबिर तडवी (३५), समीर राजू तडवी (२३), स्वराज्य (स्वप्नील पाटील) आदींचा समावेश आहे. जखमींवर चाळीसगावातील शासकीय व खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पाऊस व अंधार असल्यामुळे मदत कार्याला अडथळा निर्माण झाला. परंतु आमदार मंगेश चव्हाण व कार्यकर्त्यांनी तातडीने मदत करून रुग्णांना रुग्णालयात दाखल केले. या घटनेबाबत रात्री उशिरापर्यंत चाळीसगाव पोलीस स्टेशनला कुठल्याही प्रकारची नोंद नव्हती . दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार क्रूझर गाडीमध्ये एकूण १४ प्रवासी हे कामगार होते. ते एम.एच १३ ए.सी. ५६०४ या चारचाकीने मनमाडला गेले होते. तेथून परतत असताना चाळीसगाव तालुक्यातील हिरापूरजवळ त्यांची चारचाकी पलटी झाल्याने हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच चाळीसगाव ग्रामीण पोलीस व आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह अनेकांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्याला वेग दिला.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3ob7iTN

No comments:

Post a Comment