Breaking

Friday, December 3, 2021

मेस्मा अंतर्गत कारवाईची चर्चा; एसटी कर्मचाऱ्याची बिघडली तब्येत https://ift.tt/31riaob

औरंगाबादः अनेक बैठका आणि चर्चेनंतर सुद्धा एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर (Msrtc Worker Strike) तोडगा निघायला तयार नाही. त्यात सरकार मेस्मा () लावण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असून वैजापूर येथील कर्मचारी दीपक तुपे यांची अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. निलंबन आणि सेवासमाप्तीच्या निर्णयानंतर सुद्धा कर्मचारी संपावर ठाम असून सरकारमध्ये विलीनीकरण होईपर्यंत मागे हटणार नाही अशी भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे संप मोडीत काढण्यासाठी सरकारकडून मेस्मा कायद्यानुसार कारवाई करण्याची चर्चा सुरू आहे. तर मेस्मा कायद्यानुसार कारवाई होणार असल्याची बातमी ऐकून वैजापूर येथी एसटी कर्मचारी दीपिका तुपे ( वय ३६ ) यांची अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. वाचाः मिळालेल्या माहितीनुसार, दीपक तुपे हे वैजापूर आगाराच्या बसमध्ये चालक म्हणून कार्यरत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात ते सक्रिय असून ११ नोव्हेंबरला त्यांना निलंबित करण्यात आले होते. मात्र, तरीही ते संपावर ठाम होते. तर वैजापूर बस डेपोत सुरू असलेल्या संपातही दीपक तुपे शुक्रवारी सकाळी उपस्थित होते. मात्र यावेळी मेस्मा कायद्यानुसार कारवाईची चर्चा सुरू असताना दीपक यांना घाम फुटला. त्यांना अस्वस्थ वाटत असल्याने काही कर्मचाऱ्यांनी त्यांना घरी नेऊन सोडले. वाचाः मात्र घरी पोहचताच दीपक चक्कर येऊन बेशुद्ध पडले. ज्यामुळे त्यांना शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढील उपचार सुरू आहे. त्यामुळे मेस्माच्या कारवाईची घोषणा झाल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण पाहायला मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. वाचाः


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3ruOqkZ

No comments:

Post a Comment