Breaking

Thursday, December 2, 2021

ओमिक्रॉनमुळे भारतात तिसरी लाट?; 'ही' दिलासा देणारी माहिती आली समोर https://ift.tt/3daBg4e

नवी दिल्ली: संसर्गाच्या व्हेरिएंटमुळे जगभरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या व्हेरिएंटने गुरुवारी भारतात शिरकाव केला. कर्नाटकात आढळले. त्यामुळे भारताचं टेन्शन वाढलं असतानाच एक महत्त्वाची आणि तितकीच दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. ओमिक्रॉन हा व्हेरिएंटपेक्षा घातक आहे आणि भारतात या व्हेरिएंटमुळे करोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण मिळू शकते, असे सांगितले जात असले तरी महामारी या विषयातील प्रमुख तज्ज्ञ व 'सेंटर फॉर डीसीज डायनॅमिक्स, इकॉनॉमिक्स अँड पॉलिसी'चे संचालक आर. लक्ष्मीनारायण यांनी हा दावा फेटाळला आहे. ( ) वाचा: करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत डेल्टा व्हेरिएंटने धुमाकूळ घातला होता. भारतातील महाराष्ट्रासह अनेक राज्यांत या लाटेत रुग्णसंख्येचा उद्रेक पाहायला मिळाला. मृत्यूचे प्रमाणही अधिक राहिले. त्यामुळेच किती घातक आहे, यावरून बराच खल सध्या सुरू आहे. त्यातही ओमिक्रॉनने भारतात शिरकाव केल्यानंतर ही चर्चा अधिकच गांभीर्याने होत आहे. या पार्श्वभूमीवर आर. लक्ष्मीनारायण यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेत डेल्टा व्हेरिएंटचा उद्रेक पाहायला मिळाला. ओमिक्रॉन व्हेरिएंट इतका घातक नसेल. या व्हेरिएंटची लागण होऊन मृत्यू होण्याची शक्यताही तुलनेत कमी असेल, असा दावा लक्ष्मीनारायण यांनी केला. वाचा: ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे रुग्णसंख्या पुन्हा वाढणार असली तरी आरोग्य व्यवस्था आणि रुग्णालयांवर अधिक ताण येईल, असे वाटत नाही, अशी दिलासा देणारी माहितीही लक्ष्मीनारायण यांनी दिली. भारतात करोना विषाणूच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत अनेकांना संसर्ग होऊन गेला आहे तसेच भारतातील लसीकरणाचे प्रमाणही चांगले आहे, या बाबी पथ्यावर पडतील आणि ओमिक्रॉन व्हेरिएंट भारतासाठी कमी घातक ठरेल, असा दावाही लक्ष्मीनारायण यांनी केला. पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष श्रीनाथ रेड्डी यांनी ओमिक्रॉनवर स्वदेशी लस कोव्हॅक्सिन अधिक प्रभावी ठरू शकते, असे म्हटले आहे. वाचा:


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/31fQiDy

No comments:

Post a Comment