जालना : विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. उल्हास उढाण यांचे मध्यरात्री २.३० वाजेदरम्यान हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या अशा जाण्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली असून राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उल्हास उढाण यांचा मृतदेह घाटी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला आहे. ते काल मित्रांच्या भेटीसाठी मालेगावला गेले होते. रात्री ११ वाजेदरम्यान घरी पोहचले. त्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटले आणि हृदयविकाराचा झटका आला. यातच मध्यरात्रीनंतर ही अतिशय दुःखद घटना घडली. (बातमी अपडेट होत आहे)
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3EvrVjn
No comments:
Post a Comment