डोंबिवली: येत्या ३ महिन्यात कल्याण डोंबिवलीतील अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्याबाबत प्रशासनाने बनवलेला कृती आराखडा म्हणजे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न आहे, अशी टीका डोंबिवलीचे (MLA Ravindra Chavan) यांनी केडीएमसी प्रशासनावर केली आहे. यावेळी चव्हाण यांनी बैलगाडा शर्यतीवरील निर्बंध उठवणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचेही स्वागत केले आहे. (bjp criticizes ) एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी वारंवार सांगत आहेत की १०० टक्के लसीकरण पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा. दोन्ही डोस पूर्ण करण्यासाठी हर घर दस्तकच्या माध्यमातून केडीएमसी प्रशासनाने घराघरात जाऊन काम केले पाहीजे. त्यासाठी संपूर्ण यंत्रणा १०० टक्के लसीकरणाच्या दिशेने कशी जाईल यासाठी केडीएमसी प्रशासन का प्रयत्न करत नाही? असा परखड सवाल उपस्थित करत अनधिकृत बांधकामांवरील कृती आराखडा म्हणजे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न असल्याचे आमदार चव्हाण यांनी सांगितले पत्रकार परिषदेत सांगितले. क्लिक करा आणि वाचा- वेंगुर्ल्यासारख्या ठिकाणी विकासाचे व्हिजन आणि विकासाचा दृष्टिकोन ठेऊन अनेक विकासकामे पूर्ण झाली आहेत. विकासाचे व्हिजन कागदावरून प्रत्यक्षात कसे उतरवावे याचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे वेंगुर्ला शहर आहे. त्याठिकाणी झालेल्या योजना, लोकांना देण्यात आलेल्या सुविधा, निसर्गाचा समतोल राखून करण्यात आलेले व्हिजन आणि नियोजन केडीएमसीतील अधिकारी वर्गाने पाहण्यासारखे असल्याची उपहासात्मक भाष्यही आमदार रविंद्र चव्हाण यांनी केले. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेला भाजपचे कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे देखील उपस्थित होते. क्लिक करा आणि वाचा- शर्यतीना परवानगी मिळाल्याने शेतकरी आनंदी - भाजप आमदार रवींद्र चव्हाण भाजप आमदार रवींद्र चव्हाण यानी शर्यती सुरू करण्याच्या निर्णयाचं स्वागत केलं .ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न होता बैलगाड्यांच्या शर्यती सुरू व्हावा असे शेतकऱ्यांना वाटत होत बैल गाड्या शर्यती सुरु करण्याची त्यांची मागणी होती ,ठाणे जिल्हा असेल रायगड जिल्हा असेल किंवा राज्यातील इतर भागात देखील ही परवानगी मिळाल्याने शेतकऱ्यांना निश्चितच आनंद झाला क्लिक करा आणि वाचा-
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3IVE5ow
No comments:
Post a Comment