Breaking

Sunday, December 5, 2021

राणेंची भेट घेतलेल्या दळवी समर्थकांना सेनेतून टॉनिक कोणाचे? https://ift.tt/3EGN5LL

दापोली: दापोली मंडणगड नगरपंचायत निवडणूकित राष्ट्रवादी आघाडी होणार...माजी आमदार यांच्यावर पुन्हा जबाबदारी..शिवसेना,राष्ट्रवादी आघाडी आशा चर्चा सुरु झाल्याने शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.नक्की कोणता निर्णय शिवसेना पक्षप्रमुख घेतात याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. (will ncp come together in dopoli mandangad nagar panchayat elections) दापोली तालुका शिवसेना कार्यकारीणीने माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी पक्षविरोधी काम केल्याने कारवाई करावी असा ठराव नेत्यांकडे पाठवला होता अशी माहीती शिवसेना तालुका पदाधिकाऱ्यांनी दिली होती. विधानसभा निवडणूकितही माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी पक्षविरोधी काम केले असा आरोप अलीकडे दापोलीत झालेल्या शिवसेना संपर्क मेळाव्यात उपजिल्हाप्रमुख सुधीर कालेकर व यापूर्वी काही नेत्यांनी केला होता. क्लिक करा आणि वाचा- जनआशीर्वाद यात्रेत राणेंना दळवी भेटले ! भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेत केंद्रीय मंत्री यांनी मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले त्याच दिवशी नंतर थोड्या वेळात दळवींनी खेड नातूनगर येथील सभेत राणे यांची भेट घेतली. राणे यांच्यासमवेत दळवी नातूनगर येथील व्यासपीठावर एकत्र आले. याच्या व्हिडीओ क्लिप्सही व्हायरल झाल्या होत्या. तेही पुरावे मातोश्रीपर्यंत पोहोचले होते. नाराज दळवींना टॉनिक कोणत्या नेत्याचे? आता त्याच माजी अमदार सूर्यकांत दळवी यांच्या समर्थकांचा राष्ट्रवादी प्रवेश थोपवून रामदास कदम व सेनेतील एका नेत्यामध्ये असलेल्या वादाचे टॉनिक दळवी समर्थकांना मिळाल्याची चर्चा दापोलीत रंगली आहे.रामदास कदम यांच्या कथित ऑडीओ व्हायरल क्लिप्स प्रकरण दळवी समर्थकांच्या पथ्यावर पडल्याची कुजबुज रंगली आहे. शिवसेना नेते रामदास कदम व माजी आमदार संजय कदम यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. दापोली, मंडणगड मतदार संघात राष्ट्रवादी व शिवसेना हे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात. क्लिक करा आणि वाचा- या पार्श्वभूमीवर शिवसेना व कॉंग्रेस आघाडीचा फॉर्म्युला दापोली नगरपंचायत निवडणूकित गेली पाच वर्षे यशस्वी झाला तीच आघाडी या निवडणूकित कायम राहिल असे स्पष्ट संकेत आमदार योगेश कदम यांनी पत्रकार परीषदेत चार दिवसांपूर्वी दिले. उमेदवार निश्चित करण्याच्या हालचाली सुरु असताना अचानक या उलट सुलट चर्चा झाल्या आहेत. आमदारकी गेल्यानंतर कित्येक वर्षे नाराज असलेल्या व यापूर्वी अनेकवेळा थेट 'मातोश्री' ला अल्टीमेटम दिलेल्या सुर्यकांत दळवी यांच्या नावाची चर्चा सुरु झाल्याने कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत. शिवसेना पक्षनिरिक्षक,जिल्हा संपर्क नेते यांनी पुन्हा इच्छुक उमेदवारांच्या गुरुवारी दापोलीत येऊन मुलाखती घेऊन स्थानिक पातळीवरील शिवसेना राष्ट्रवादी आघाडीबाबत काय मत आहेत याचीही चाचपणी केली आहे. शिवसेनेकडून राष्ट्रवादिबरोबर जाण्यास तीव्र विरोध दर्शवला आहे. क्लिक करा आणि वाचा- दरम्यान राष्ट्रवादीने आधीच स्वबळाची घोषणा केली होती मात्र आता पक्षादेश मानून सेनेबरोबर जाण्याची तयारी माजी आमदार संजय कदम यानी दर्शवली आहे.मात्र आता आघाडी झाल्यास शिवसेना राष्ट्रवादी आघाडी कशी जूळणार याची उत्सुकता लागुन राहीली असून कॉंग्रेस नक्की कोणती भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3dm93Y7

No comments:

Post a Comment