Breaking

Friday, December 17, 2021

जे कोणत्या मराठी कलाकाराला जमलं नाही ते आदिनाथनं केलं https://ift.tt/3FaoO0O

मुंबई- अभिनेता ने आपल्या कारकिर्दीत यशाची अनेक शिखर पादाक्रांत केली आहेत. २०२१ हे वर्ष आदिनाथसाठी करिअरच्यादृष्टीने तर अविस्मरणीय वर्ष ठरलं असं म्हणावं लागेल. यंदा आदिनाथला 'पाणी' चित्रपटासाठी सर्वोच्च मानला जाणारा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. यावर्षी आदिनाथने डिजीटल विश्वात सिटी ऑफ ड्रिम्स वेब सीरिजद्वारे पदार्पण करत आपला वेगळा ठसा उमटवला. मराठी सिनेसृष्टीत गेली काही वर्ष यशस्वी करिअर करत असलेल्या आदिनाथचं २४ डिसेंबरला बॉलिवूड विश्वात डेब्यू होत आहे. कबीर खान दिग्दर्शित ८३ चित्रपटामधून क्रिकेटर दिलीप वेंगसरकर यांच्या भूमिकेत आदिनाथ आपला अभिनयाचा ठसा उमटवताना दिसेल. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच दुबईच्या बुर्ज खलिफावर दाखवण्यात आला. आदिनाथ कोठारे पहिला मराठी अभिनेता-दिग्दर्शक आहे, ज्याचा ट्रेलर बुर्ज खलिफावर दाखवण्यात आला. ही गोष्ट नक्कीच त्याच्या चाहत्यांसाठी अभिमानाची बाब आहे. याविषयी आपल्या भावना व्यक्त करताना आदिनाथ म्हणला की, 'मी आता खूप भावूक झालो आहे. जगातल्या सर्वात उंच इमारतीवर आपला चेहरा जगाला दिसणं हे कोणत्याही अभिनेत्यासाठी निश्चितच आनंदाची गोष्ट आहे. ८३ सिनेमाचा ट्रेलर बुर्ज खलिफावर दाखवल्यापासून मला माझ्या कुटूंबाचे, मित्र- परिवारांचे, चाहत्यांचे अभिनंदन करणारे भरपूर मेसेज येत आहेत. जगभरातून सध्या माझ्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आपल्या कुटुंबाला–चाहत्यांना आपला गर्व वाटावा, असं काही करायला मिळणं प्रत्येक अभिनेता-दिग्दर्शकासाठी गौरवाची गोष्ट आहे.'


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3sfH592

No comments:

Post a Comment