पणजी: जवळ आल्याने आधीच राजकारण तापलेले असताना खळबळजनक वृत्त हाती आले आहे. सेक्स स्कँडलमध्ये सामील असल्याचा आरोप झाल्यानंतर सरकारमधील मंत्री यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. हा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर करण्यात आला असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. ( Goa Bjp Minister ) वाचा: काँग्रेसचे गोवा प्रदेशाध्यक्ष यांनी भाजप आमदार आणि मंत्री मिलिंद नाईक यांच्यावर गंभीर आरोप केले होते. असल्याचा दावा करत चोडणेकर यांनी खळबळ उडवून दिली होती. याबाबत सबळ पुरावेही असल्याचा दावा त्यांनी केला होता. त्यानंतर मोठ्या घडामोडी घडल्या असून मिलिंद नाईक यांचा राजीनामा घेण्यात आला आहे. मिलिंद नाईक यांनी मंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांकडे पाठवला असता हा राजीनामा राज्यपालांनी मंजूर केला आहे, असे मुख्यमंत्री कार्यालयातून सांगण्यात आले आहे. सेक्स स्कँडलच्या आरोपांची निष्पक्षपणे चौकशी व्हावी, यासाठी मिलिंद नाईक यांनी राजीनामा दिल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. वाचा: नेमका काय आहे आरोप? गोव्यात गेल्या काही दिवसांपासून हे सेक्स स्कँडल गाजत आहे. यात एका मंत्र्याचा सहभाग असल्याचा दावा करण्यात येत होता. त्यातच बुधवारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणेकर यांनी मंत्री मिलिंद नाईक यांचे नाव घेऊन आरोप केला. बिहारमधील एका महिलेचे लैंगिक शोषण करण्यात आल्याचा गंभीर आरोप करत याचे ऑडिओ आणि व्हिडिओ पुरावेही असल्याचा दावा चोडणेकर यांनी केला. चोडणेकर यांनी दोन दिवसांपूर्वीच राज्यापालांची भेट घेऊन संबंधित मंत्र्याचा राजीनामा घेण्यात यावा, अशी मागणी केली होती. त्याचवेळी ऑडिओ व व्हिडिओ पुराव्यांसह काँग्रेस नेते संकल्प आमोणकर यांनी पणजी पोलीस ठाण्यात तक्रारही केली. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत मिलिंद नाईक यांना पदावरून हटवण्यात आले आहे. मिलिंद नाईक हे गोव्यातील प्रमोद सावंत सरकारमध्ये नगरविकास आणि समाजकल्याण या खात्यांचे मंत्री होते. वाचा:
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3m7VaBU
No comments:
Post a Comment