Breaking

Thursday, December 16, 2021

खोपोलीजवळ एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तर तीन जखमी https://ift.tt/3GQWbWC

खोपोली: मुंबई पुणे एक्सप्रेस वर मुबंईच्या दिशेला येणा-या ट्रकने खोपोली एक्झीटच्या पुढे घाट उतरताना रस्त्याच्या बाजुला उभ्या असलेल्या अँफकाँन कपंनीच्या ट्रकला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ट्रकजवळ उभा असलेला ट्रक चालक शैलेश गडपाले याचा जागीच मृत्यू झाला. तर, या अपघातात अन्य तीन जण गंभीर जखमी झाले. जखमींना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात हलविण्यात आले. अपघातानतंर याठिकाणी मदतकार्य चालू असल्यामुळे काही काळ वाहतूक कोंडीचा त्रास झाला. परंतु काही वेळानतंर दोन लेन सुरळीत सुरू करण्यात आल्या. खोपोली पोलीस, बोरघाट पोलीसांसह अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी टिमचे गुरुनाथ साठेलकर, हनिफ कर्जीकर यांनी मोलाचे सहकार्य केले. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/30wGapm

No comments:

Post a Comment