Breaking

Thursday, December 2, 2021

ओमिक्रॉनच्या एंट्रीने भारतात खळबळ; कडक निर्बंधांची शक्यता, या राज्यांत... https://ift.tt/3lvEa8a

नवी दिल्ली: भारतात व्हेरिएंटने शिरकाव केला आहे. कर्नाटकात या व्हेरिएंटचे दोन रुग्ण आढळले आहेत तर यातील एका रुग्णाच्या संपर्कातील पाच जण चाचणीत पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे कर्नाटकसह सर्व राज्ये सतर्क झाली असून केंद्र सरकारही या विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी कठोर पावले टाकताना दिसत आहे. ( ) वाचा: आढळल्यानंतर केंद्रीय आरोग्यमंत्री यांनी विमानतळ आणि बंदरे विभागातील आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक घेतली. अन्य दक्षता व तपासणी अधिकाऱ्यांशीही त्यांनी चर्चा केली व ओमिक्रॉनचा धोका अधोरेखित करत महत्त्वाच्या सूचना केल्या. ज्या राज्यात ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले त्या कर्नाटकातही वेगवान पावले टाकण्यात येत आहेत. राज्यात नवीन कोविड नियमावली लागू करण्यात येईल. तज्ज्ञांची मदत घेतली जाईल. प्रामुख्याने हाय रिस्क देशांतून येणाऱ्या प्रवाशांसाठी कडक नियम केले जातील, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले. वाचा: महाराष्ट्रात कठोर नियम ओमिक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात हवाई प्रवाशांसाठी निर्बंध आणखी कठोर करण्यात आले आहेत. दक्षिण आफ्रिका, बोत्स्वाना आणि झिंबाब्वे या 'हाय रिस्क' राष्ट्रांतून येणाऱ्या प्रवाशांवर अधिक लक्ष केंद्रीत करण्यात आलं आहे. उच्च जोखीम असलेले हवाई प्रवाशांना प्राधान्यक्रमाने स्वतंत्र काउंटरवर उतरण्यासाठी वेगळी व्यवस्था तेथील विमानतळ व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत केली जाऊ शकेल, जेणेकरून राज्यातील सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांच्या तपासण्या आणि पडताळणी करणे सोपे व्हावे. अशा सर्व हाय रिस्क हवाई प्रवाशांना आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताच तात्काळ आरटीपीसीआर चाचण्या कराव्या लागतील आणि सात दिवस सक्तीच्या संस्थात्मक विलगीकरणात राहावे लागेल. त्यांची दुसरी आरटीपीसीआर चाचणी सात दिवसाच्या कालखंडानंतर करण्यात येईल. या चाचणीत जर कोणीही पॉझिटिव्ह आढळल्यास अशा हाय रिस्क प्रवाशांना कोविड उपचाराच्या सुविधा असलेल्या रुग्णालयात दाखल करण्यात येईल आणि जर सातव्या दिवशी घेतलेल्या आरटीपीसीआर चाचणीत त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला तर अशा उच्च जोखीम असणाऱ्या हवाई यात्रेकरूंना सात दिवसांसाठी गृह विलगीकरणात राहणे बंधनकारक असेल, असे सरकारने नमूद केले आहे. लिमिटेड (एमआयएएल) यांनी मागील पंधरा दिवसांत हवाई प्रवास करणाऱ्या प्रवाशांची माहिती सर्व एयरलाइन्सकडे द्यावी जेणेकरून या प्रवाशांच्या यात्रेसंबंधी माहितीची पडताळणी करणे सोपे होईल. प्रवाशांनी चुकीची माहिती दिल्याचे आढळल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या विविध कलमांखाली त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. देशांतर्गत हवाई प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना पूर्णपणे लसीकरण केले असणे आवश्यक आहे. असे नसेल तर त्यांच्याजवळ आगमनाच्या ७२ तासाअगोदरचा आरटीपीसीआर निगेटिव्ह अहवाल असणे बंधनकारक असेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. वाचा: कोणत्या राज्यात कोणते नवे नियम? - उत्तर प्रदेश सरकारने लखनऊमधील दोन प्रमुख रेल्वे स्टेशन्स, बस स्टँड आणि गर्दीच्या ठिकाणी कोविड चाचणी करण्याचा निर्णय घेतला. बाहेरून येणाऱ्या प्रवाशांची एंट्री पॉइंटवरच तपासणी होईल व ट्रॅव्हल हिस्ट्री नोंदवून घेतली जाईल. - दिल्लीत रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेत आरोग्य सुविधा वाढवण्यावर भर देण्यात येत आहे. रुग्णालयात ३० हजारपेक्षा अधिक बेड सज्ज ठेवताना ऑक्सिजन पुरवठ्याचा आढावा घेतला जात आहे. - तामिळनाडूत ११ देशांतून आलेल्या ४७७ प्रवाशांची कोविड चाचणी निगेटिव्ह आली आहे. तरीही खबरदारीची पावले उचलली जात आहेत. चेन्नई, तिरुचिरापल्ली, कोइम्बतूर, मदुराई येथे ४ वैद्यकीय महाविद्यालयांत वेगळे वॉर्ड निर्माण करण्यात आले आहेत. वाचा:


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3oiE7yl

No comments:

Post a Comment