Breaking

Friday, December 3, 2021

जवाद चक्रीवादळाबाबत मोठी बातमी; 'या' तीन राज्यांना धोका, अलर्ट जारी https://ift.tt/3lxkLDS

नवी दिल्ली: ‘बंगालच्या उपसागरातील ‘ ’ चक्रीवादळ उद्या (शनिवारी) सायंकाळी किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे,’ असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे संपूर्ण पूर्व किनारपट्टीवर बचावकार्यासाठी सज्जता ठेवण्यात आली आहे. दरम्यान, चक्रीवादळाचा धोका लक्षात घेत आणि जारी करण्यात आला असून किमान २४ गाड्या रेल्वेने रद्द केल्या आहेत. ( ) वाचा: ‘मुसळधार पावसामुळे वीजवाहिन्या आणि दूरसंचार विभागाच्या वाहिन्यांचे नुकसान होऊ शकते. आंध्र प्रदेश राज्यात किनारी भागात चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे. हे चक्रीवादळ विशाखापट्टणम किनाऱ्यावर शनिवारी सायंकाळी धडकण्याची शक्यता आहे. त्यानंतर चक्रीवादळ ओडिशा किनाऱ्याकडे वाटचाल करील. या काळात आंध्र आणि ओडिशा किनारपट्टीवर मुसळधार पावसाची शक्यता आहे. शनिवारी पावसाचा जोर अधिक राहील. वाऱ्यांचा वेग सुरुवातीला ताशी ५० ते ५५ किलोमीटर राहील, हळूहळू तो वाढून ताशी १०० किलोमीटरपर्यंत पोहचेल,’ अशी माहिती हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी दिली. वाचा: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबंधित राज्यांतील मंत्रालये आणि केंद्रीय मंत्रालयातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तयारीचा आढावा घेतला. लोकांची सुरक्षितता आणि सुरक्षित स्थलांतर यांना सर्वोच्च प्राधान्य द्यावे. वीज, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, दूरसंचार यंत्रणा शक्यतो खंडित होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना पंतप्रधानांनी या बैठकीत केल्या आहेत. ‘एनडीआरएफ’ची ६४ पथके सज्ज जवाद चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर शनिवारी धडकण्याची शक्यता असल्यामुळे आंध्रासह ओडिशा आणि या राज्यांत राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (एनडीआरएफ) ६४ तुकड्या नियुक्त करण्यात आल्या आहेत, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. त्यातील ४६ तुकड्या तैनात करण्यात आल्याचे सांगण्यात आले. उर्वरित तुकड्या राखीव असतील. या तुकड्यांपैकी पश्चिम बंगाल आणि आंध्रमध्ये प्रत्येकी १९ आणि ओडिशामध्ये १७ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. ओडिशाकडून २६६ बचाव पथके सज्ज ओडिशा सरकारने राज्य आपत्ती निवारण दल आणि अग्निशमन दल मिळून २६६ बचाव पथके सज्ज ठवली आहेत, अशी माहिती विशेष बचाव आयुक्त प्रदीपकुमार जेना यांनी दिली. राज्य सरकारने किनारपट्टीवरील १४ जिल्ह्यांमध्ये दक्षतेचा इशारा दिला असून, अधिकाऱ्यांना आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. सखल भागातील रहिवाशांचे आधीच स्थलांतर करण्यासही सांगण्यात आले आहे, असेही जेना यांनी सांगितले. वाचा:


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3ojnv9x

No comments:

Post a Comment