Breaking

Wednesday, December 15, 2021

'ओबीसी आरक्षणाबाबत केंद्र सरकारचा डेटा खोटा; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप https://ift.tt/3m4cAiA

ठाणे: केंद्र सरकारकडून संसदेत २०१६ साली ओबीसी समाज आरक्षणाचा (OBC Reservation) डेटा खरा असल्याचा दावा करण्यात आला होता, त्यानंतर आता तोच डेटा फेल असल्याच बोललं जात आहे. त्यामुळे केंद्र सरकार ओबीसी समाज डेटाच्या बाबतीत खोट बोलत असल्याचा आरोप राज्याचे गृहनिर्माण मंत्री (Jitendra Awhad) यांनी केला. सरकार खोट का बोलतंय? याबाबत पार्लमेंटमध्ये प्रश्न उठायला हवा आहे असेही यावेळी आव्हाड म्हणाले. या डेटावरून देशातील समस्त ओबीसी समाजाला समजतंय काय चाललय आणि देशातील समस्त ओबीसी समाज भविष्यात एक होईल हे लक्षात ठेवा, असा इशारा गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांनी दिला आहे. (housing minister criticizes central govt over ) या बरोबरच व्होट बँकसाठी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कोणासोबत करू नका. महाराज एकमेव अद्वितीय आहेत, त्यांच्या करकीर्दीवर कळस चढवणे म्हणजे काय? काय तुलना करत आहे तुम्ही? कृपया करून त्यांची तुलना कोणाशी करू नये, अशी विनंती यावेळी आव्हाड यांनी केली आहे. क्लिक करा आणि वाचा- इम्पेरिकल डेटाची अट पूर्ण केली गेली नाही त्यामुळे ओबीसी समाजावरील स्थगिती सुप्रीम कोर्टाकडून कायम ठेवण्यात आली आहे. याबाबत राज्यसरकारला चांगलाच दणका मिळाला आहे. मात्र केंद्र सरकारकडून तयार करण्यात आलेला इम्पेरिकल डेटा फेल असल्याच बोललं जात आहे. यावर राज्याचे गृहनिर्माण मंत्री यांनी केंद्र सरकार या ओबीसी आरक्षण डेटा बाबत खोट बोलत असल्याचा आरोप केला आहे. पुढे बोलताना आव्हाड म्हणाले, २०१६ साली संसदेत केंद्र सरकारने हाच डेटा ९८.४७ टक्के परफेक्ट असल्याचा बोलले होते, आणि आज २०२१ मध्ये तोच डेटा फेल असल्याचे बोलत आहेत. म्हणजे केंद्र सरकार एकतर सुप्रीम कोर्टाला खोत बोलतय नाहीतर संसदेत खोट सांगत होत, असा आरोप यावेळी आव्हाड यांनी केला आहे. ओबीसी हा देशभरात पसरलेला आहे, देशाच्या लोकसंख्येच्या 50 टक्के लोकसंख्या ओबीसी समाजाची आहे. त्यामुळे काय चाललंय हे समस्त ओबीसी समाजाला समजतंय.. भविष्यात ओबीसी समजा एक होतील हे लक्षात ठेवा असा इशारा यावेळी राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे. क्लिक करा आणि वाचा- चंद्रकांत पाटील यांच्यावर साधला निशाणा त्याच बरोबर हिंदुत्व आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी एक प्रतिक्रिया दिली होती यावर गृहनिर्माण मंत्री यांनी ट्वीटर सडकून टीका केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव अद्वितीय आहेत, त्यांच्या करकीर्दीवर कळस चढवणे म्हणजे काय? काय तुलना करत आहे तुम्ही? शिवाजी महाराजांची तुलना करता येणार नाही. कृपया करून महाराजांची तुलना कोणाशी करू नये, पायाला हात लावून विनंती देखील आव्हाडांनी केली आहे. जरा इतिहास पठण केले तर सर्व जण महाराजांच्या बरोबर कोण होते? ते क्रांतीकारक नेता होते, तसेच इथले वंचित एकत्र कसे आले याची माहिती मिळेल.. त्यामुळे महाराजांची तुलना कोणासोबत करू नका अशी विनंती देखील गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांनी केली आहे. क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/33xDlpk

No comments:

Post a Comment