नवी दिल्ली : आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स आणि ६० वर्षांवरील नागरिकांना दिला जाणारा ( ) म्हणजेच तिसरा डोस हा आधीच्या लसीचाच द्यायचा का? यावर व्यापक विचार केला जात आहे. याबाबत लवकरच निर्णय अपेक्षित आहे, असे केंद्र सरकारने गुरुवारी सांगितले. येत्या १० जानेवारीपासून आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स आणि ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना हा प्रिकॉशन डोस दिला जाणार आहे. त्यापूर्वी सरकार स्पष्ट शिफारशी जारी करेल, असे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) चे महासंचालक डॉ. बलराम भार्गव म्हणाले. आम्ही सर्वसमावेशक चर्चा करत आहोत (कोणती लस खबरदारीचा डोस म्हणून द्यायची आहे). आम्ही काल आणि आज NTAGI (नॅशनल टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुप ऑन इम्युनायझेशन) मध्ये अनेक बैठका घेतल्या आहेत. या लसीची किती लोकसंख्येची गरज आहे, हे आम्ही ठरवत आहोत. यामध्ये फ्रंटलाइन वर्कर्स, आरोग्य सेवा कर्मचारी आणि इतर आजार असलेल्या ६० पेक्षा अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांचा यात समावेश आहे. सुरक्षा आणि परिणामकारकतेच्या दृष्टीने कोणत्या नवीन लसी उपलब्ध आहेत आणि कोणत्या लसी दिल्या जाऊ शकतात, यावर विचार केला जात असल्याचे भार्गव म्हणाले. प्रिकॉशन डोस दिल्याने संसर्ग होणार नाही, असे अजिबात नाही. या डोसमुळे रोगाची गंभीरता कमी होईल, हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची गरज पडणार आणि मृत्यूही रोखता येतील, असे त्यांनी सांगितले. कोणती लस दिली जाऊ शकते? यासाठी आम्ही उपलब्ध असलेल्या सर्व डेटाचे विश्लेषण करत आहोत. अशा किती लसी आहेत, हे बघितले जात आहे. पण याबाबत १० जानेवारीपूर्वी आम्हाला स्पष्ट शिफारशी मंजूर करायच्या आहेत. DCGI आणि NTAGI यांची बैठक होत असून त्यावर निर्णय घेतला जाणार आहे. प्रिकॉशन डोससाठी पात्र असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना सरकारकडून एसएमस पाठवण्यात येईल. आणि त्यांना कळवले जाईल, असं ते म्हणाले. आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स आणि ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणाऱ्या लसीचा प्रिकॉशन डोससाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. प्रिकॉशन डोस म्हणजे तिसरा डोसा दुसऱ्या डोसच्या तारखेपासून नऊ महिने पूर्ण झाल्यावर किंवा ३९ आठवडे पूर्ण झाल्यानंतर दिला जाणार आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3mJz60s
No comments:
Post a Comment