प्रसाद रानडे, चिपळूण कोकणात अतिवृष्टी,महापूर, वादळ,डोंगर खचणे या नैसर्गिक संकटामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या सगळ्यावर विविध उपाययोजना करण्यासाठी आज हिवाळी अधिवेशनात रत्नागिरी जिल्हयातील , शेखर निकम, योगेश कदम या आमदारांनी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आवाज उठवला आहे. सगळ्यानाच आवडते पण सत्ताधारी असतील अथवा विरोधक कोकणाला निधी देण्यासाठी नेहमीच हात आखडता घेतला जातो. नेहमीच कोकणच्या तोंडाला आश्वासन देऊन पान पुसली जातात, अशा परखड शब्दात चिपळूणचे यांनी सभागृहात आपल्या भावना व्यक्त केल्या. ( raised issues in the Legislative Assembly session) कोकणात महाड, खेड,चिपळूण,संगमेश्वर येथील नदयां मधील गाळ काढण्यासाठी पाचशे ते सातशे कोटी रुपये तातडीने नियोजन करून दया अशी मागणी त्यांनी केली.एकेकाळी गलबत लागत होती मात्र आता होडीही जाऊ शकत नाही इतका गाळ साठला आहे ही गंभीर बाब नमुद करुन आमदार शेखर निकम यांनी या चालू हिवाळी अधिवेशनात शासनाचे लक्ष वेधले आहे. क्लिक करा आणि वाचा- कोकणात यंदा पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे चिपळूण शहरात महापुराने हाहाकार उडाला होता. नदीतील गाळ काढा व नंतरच पुररेषा निश्चित करा यासाठी चिपळूण बचाव समितीने सुरू केलेल्या साखळी उपोषण आता तीव्र झाले असून आज बुधवारी चिपळूण बंदची हाक देण्यात आली होती त्यालाही उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. चिपळूण शहरातून वाहणारी वाशिष्ठी नदीचा नियोजनबध्द पध्दतीने तातडीने गाळ काढण्यासंदर्भात तसेच चिपळूण शहराला महापुरापासून वाचवण्यातकरीता पुररेषेसंबंधी निर्माण झालेला प्रश्न मार्गी लावणेसंदर्भात तसेच चिपळूण शहर बचाव समितीच्या सुरू असलेल्या आंदोलनाबाबत आमदार शेखर निकम यांनी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत चिपळूण च्या जनतेच्या भावना मांडल्या आहेत. क्लिक करा आणि वाचा- दापोली खेड मंडणगडचे यांनी कोकणात माझ्या मतदारसंघात चक्रीवादळ व अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले यात नळपाणी योजना,शाळा इमारती यांचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारने वैयक्तिक नुकसानभरपाई चांगल्या प्रकारे दिली आहे त्याबद्दल मुख्यमंत्रीमहोदय व सरकारचे अभिनंदनही करतो. यासाठी निधीची आवश्यकता असून याकडे सरकारचे दुर्लक्ष झाले आहे याकडे सरकारचे त्यांनी लक्ष वेधले. मदत व पुनवर्सनमंत्री विजय शेट्टी यांनी यासाठी बैठक लावून निधीची उपलब्धता करून देण्यात येईल असे आश्वासन सभागृहात दिले. क्लिक करा आणि वाचा- हिवाळी अधिवेशनात गुहागर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भास्कर जाधव यांनी धोकादायक स्थितीत असलेले डोंगर खाली येतात येथे असलेल्या घरांचे पुनर्वसन आवश्यक आहे. पण गावच्या गाव पुनवर्सन करणे शक्य नाही. यासाठी नैसर्गिक आपत्तीमुळे धोकादायक झालेल्या गावांचे पुनर्वसन करण्यासाठी आमदार भास्कर जाधव यांनी विधानसभेत सभागृहात बोलताना पर्याय सुचवून आपली भूमिका मांडली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर या हिवाळी अधिवेशना नंतर कोकणातील या सगळ्या नैसर्गिक संकटाच्या प्रश्नांवर उपाययोजना करण्यासाठी कोणती भूमिका घेते निधीअभावी रखडलेल्या या जनहिताच्या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी तातडीने कार्यवाही होणार का?याकडे अवघ्या रत्नागिरी जिल्हयाचे लक्ष लागले आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3H5uMR3
No comments:
Post a Comment