चंद्रपूर: वरोरा येथे सूरू असलेल्या आमदार चषक स्पर्धेत प्रेषक गॅलरी कोसळल्याने सात गंभीर तर दहा ते बारा जण किरकोळ जखमी असल्याची माहीती आहे. जखमीवर प्राथमिक उपचार करून चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले आहे. वरोरा येथे दरवर्षी कब्बडी सामन्याचे आयोजन केले जाते. शनिवारपासून या स्पर्धेला सुरवात झाली आहे. काल सामन्याचा पहिलाच दिवस असल्याने सामना बघायला प्रेषकांनी अलोट गर्दी केली होती. प्रेक्षकांची गर्दी जास्त झाल्यामुळं गॅलरी पत्त्यासारखी खाली कोसळली आहे. वाचाः आमदार चषक कबड्डी स्पर्धेदरम्यान हा प्रकार घडला आहे. काँग्रेस आमदार प्रतिभा धानोरकर यांच्यावतीने कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, लाकडी प्रेक्षक गॅलरीचे वजन जास्त झाल्यामुळं ती पत्त्यांसारखी कोसळली. यामध्ये १० ते १२ जण जखमी झाले असून यात मुलांचाही समावेश असल्याची माहिती आहे. सर्व जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. वाचाः
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3dBtHnv
No comments:
Post a Comment