सांगली : प्रियकराच्या मदतीने आईनेच अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या साडेतीन वर्षाच्या मुलाचा खून केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी उघडकीस आली आहे. मनन सुशांत वाजे (वय साडेतीन वर्षे, रा. माळभाग, वाळवा) असं मृत मुलाचं नाव आहे. या घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याबाबत संशयित महिलेचा पती सुशांत सुधीर वाजे (रा. माळभाग, वाळवा) यांनी आष्टा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी फिर्यादीची पत्नी प्राची सुशांत वाजे आणि तिचा प्रियकर अमरसिंह विश्वासराव पाटील (रा. बिळाशी, ता. शिराळा) या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. () आष्टा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशांत वाजे यांना त्यांची पत्नी प्राची हिचे बिळाशी येथील अमरसिंह पाटील याच्याशी अनैतिक संबंध असल्याची शंका होती. २७ जून २०२१ रोजी प्राची वाजे ही मुलगा मननसह घरात कोणाला काहीही न सांगता निघून गेली होती. ती अमरसिंह पाटील याच्या मुंबईतील घरी गेल्याची माहिती सुशांत यांना मिळाली. यावेळी अनैतिक संबंधास अडथळा ठरत असल्याने प्राची आणि अमरसिंह यांनी मननचा शारीरिक छळ सुरू केला. त्यानंतर दोघांनी मनन याचा खून करून त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली. मनन याचा मुंबई येथे मृत्यू झाला असताना अमरसिंह पाटील आणि प्राची यांनी बिळाशी ग्रामसेवकांकडे प्रतिज्ञापत्र देऊन मनन याचा बिळाशी येथे मृत्यू झाल्याची खोटी माहिती दिली. त्यानंतर प्राची आणि अमरसिंह हे दोघे पुन्हा मुंबईला गेले होते. याबाबत सुशांत वाजे यांना एक निनावी पत्र मिळाल्यानंतर मननच्या हत्येचा प्रकार उघडकीस आला आहे. आष्टा पोलिसांनी संशयित आरोपी अमरसिंह आणि प्राची या दोघांवर गुन्हा दाखल केला असून त्यांच्या अटकेसाठी एक पथक तैनात करण्यात आलं आहे. दरम्यान, अनैतिक संबंधांच्या आहारी गेलेल्या आईनेच आपल्या पोटच्या मुलाचा जीव घेतल्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3F4FXZw
No comments:
Post a Comment