पुणे/नवी दिल्ली : करोनाचा नवीन वेरियंट ओमिक्रॉनचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळेच रात्रीचा कर्फ्यू आणि इतर निर्बंधांपासून ते मोठ्या मुलांचे लसीकरण आणि प्रतिबंधात्मक लसीकरणापर्यंतच्या धोरणांचा अवलंब केला जात आहे. दरम्यान, भारतीय SARS-CoV-2 genomics consortia ने आपल्या नव्या बुलेटिनमधून मोठी माहिती दिली आहे. ओमिक्रॉन हा लस किंवा व्हायरसच्या संसर्गामुळे निर्माण झालेल्या रोगप्रतिकारक शक्तीला चकवा देण्यास बऱ्याच प्रमाणत सक्षम असल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे, पुण्यातील इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीने (ICMR-NIV) ओमिक्रॉन स्ट्रेन वेगळा करण्यात यश आले आहे. यामुळे अँटिबॉडीवर मात करण्यासाठी ओमिक्रॉन काय करतो, हे अधिक खोलवर कळणार आहे. ओमिक्रॉनचे सर्व म्युटेशन वेगळे करण्यात यश 'करोना व्हायरसच्या ओमिक्रॉन वेरियंटला सर्व बदलांसह वेगळे करण्यात आले आहे. ही एक मोठी प्रगती आहे. यामुळे लसीच्या परिणामकारकतेचा अभ्यास करता येईल. Omicron विरुद्ध CoveShield आणि Covaccine कितपत प्रभावी आहेत हे आपल्याला येत्या दोन आठवड्यांत कळू शकेल, अशी माहिती ICMR ने दिली आहे. द टाइम्स ऑफ इंडियाने (ToI) हे वृत्त दिले आहे. संसर्गापासून तयार झालेल्या अँटिबॉडीजवर ओमिक्रॉनचा काय परिणाम होतो? याचाही अभ्यास होणार ज्या नागरिकांमध्ये करोनाच्या जुन्या वेरियंटच्या संसर्गामुळे अँटिबॉडीज तयार होतात, त्यांच्यावरही ओमिक्रॉन हल्ला करण्यास सक्षम आहे का? हेही तपासले जाईल. 'व्हायरसला वेगळे करणे हे एक मोठे यश आहे आणि त्याला जाणून घेण्याच्या दिशेने पहिले पाऊल आहे. आम्ही आता Omicron चा CovShield आणि Covaccine या लसींवर तसेच संसर्गामुळे निर्माण होणाऱ्या अँटिबॉडीजवर होणाऱ्या परिणामाचा अभ्यास करू शकू, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. लसीद्वारे तयार झालेल्या अँटिबॉडीजच्या तुलनेत संसर्गामुळे निर्माण झालेल्या अँटिबॉडीजवर ओमिक्रॉन किती प्रमाणात चकवा देऊ शकतो हे देखील या अभ्यासातून शोधले जाईल. संसर्ग झाल्यानंतर संपूर्ण मानवी शरीरात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते, 'स्पाइक्स' सारखे फक्त काही भागात होत नाही. यामुळे व्हायरसचे म्युटेशन अँटिबॉडीजला चकवा देऊ शकत नाहीत, असे बऱ्याच तज्ञांना वाटते. Omicron अँटिबॉडीजला चकवा देऊ शकतो, INSACOG ची कबुली कोविड महामारीसाठी जबाबदार असलेल्या SARS-CoV-2 च्या स्पाइक प्रोटीनमध्ये १,२७३ अमिनो अॅसिड असतात, जे रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करतात. नवीन ओमिक्रॉनच्या स्पाइक प्रोटीनमध्ये उपस्थित असलेल्या ३२ अमिनो अॅसिडमध्ये बदल झाले आहेत. त्यामुळे लसी ओमिक्रॉन विरूद्ध बहुतांशी प्रभावी ठरण्याची क्षमता ठेवतात. पण अँटिबॉडीज असलेल्या नागरिकांनाही संसर्ग करण्यास ओमिक्रॉन सक्षम असल्याचे दिसते. पण गंभीर लक्षणे निर्माण करण्याची क्षमता नाही, असेही INSACOG ने म्हटले आहे. INSACOG ने जगभरातून गोळा केलेल्या डाटाचा आधारावर माहिती दिली. 'प्राथमिक मूल्यांकनांमध्ये ओमिक्रॉनमुळे होणारी रोगाची पातळी आधीच्या लहरींच्या तुलनेत सौम्य असल्याचे दिसून येते. कमी रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या वृद्धांवर Omicron किती प्रमाणात परिणाम करेल, हे अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे धोका अजूनही अधिकच आहे, असे INSACOG स्पष्ट केले आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3mKGI2W
No comments:
Post a Comment