Breaking

Friday, December 17, 2021

MPSCच्या विद्यार्थ्याची आत्महत्या; सुसाईड नोटमधून मांडलं विदारक वास्तव https://ift.tt/3IW69rN

पुणे : स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचं सत्र सुरूच असून आता पुणे जिल्ह्यातील तालुक्यातील देऊळगाव गाडा येथील एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. मल्हारी नामदेव बारवकर असं आत्महत्या केलेल्या २५ वर्षीय विद्यार्थ्याचं नाव आहे. () मल्हारी हा एमपीएससीच्या पूर्व परीक्षेची तयारी करत होता, याआधी त्याने दोन ते तीन वेळा पूर्व परीक्षा दिली होती, मात्र त्यामध्ये त्याला यश आलं नाही. यामुळे नैराश्यात गेलेल्या मल्हारी बारवकर याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मल्हारी हा गरीब कुटुंबातील तरुण होता. त्याचे वडील सार्वजनिक बांधकाम विभागात मैलकोली आहेत. नैराश्यातून मल्हारी याने आत्महत्या केली असल्याची माहिती कुटुंबातील व्यक्तींनी दिली असून मल्हारी याच्या आत्महत्येनंतर घरात एक सुसाईड नोटही आढळली आहे. यामध्ये मल्हारीने आत्महत्येचं कारण लिहून ठेवलं आहे. 'तुम्हाला दाखवलेली स्वप्न मी पूर्ण करू शकत नाही आणि तुमचे पडलेले चेहरेही पाहू शकत नाही,' असं मल्हारी बारवकर याने सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. या घटनेप्रकरणी यवत पोलीस पुढील तपास करत आहेत. दरम्यान, यापूर्वीही एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या स्वप्निल लोणकर या दौंड तालुक्यातील विद्यार्थ्याने आत्महत्त्या केली होती.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3yJG8r2

No comments:

Post a Comment