Breaking

Friday, December 3, 2021

धक्कादायक: 'Omicron...अब लाशें नहीं गिननी'; डॉक्टरने पत्नी, दोन मुलांची केली हत्या https://ift.tt/31ifbyp

कानपूर: कानपूरमधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका डॉक्टरने पत्नी आणि दोन मुलांची हत्या केली असून या घटनेनंतर तो फरार झाला आहे. पोलीस या डॉक्टरचा शोध घेत असून पोलिसांना घटनास्थळी जी डायरी मिळाली आहे त्यात धक्कादायक नोट लिहिलेली आहे. 'अब और नही. ये कोविड सबको मार डालेगा. अब लाशें नहीं गिननी. ', असा मजकूर यात असून या डॉक्टरची मानसिक स्थिती गेल्या काही दिवसांपासून बिघडली होती आणि त्यातूनच त्याने हे भयंकर कृत्य केल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. ( ) कानपूरमधील भागात राहणारा हा एका खासगी रुग्णालयात सेवेत आहे. शुक्रवारी संध्याकाळी सुशीलकुमारने पत्नी चंद्रप्रभा (४८), मुलगा शिखर (१८) आणि मुलगी खुशी यांची गळा दाबून हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे सुशीलकुमारनेच याबाबतची माहिती व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून भाऊ सुनील याला दिली आणि पोलिसांना कळवण्यास सांगितले. मी डिप्रेशनमध्ये असल्याचे पोलिसांना सांग असेही त्याने भावाला सांगितले. त्यानंतर डॉक्टर घटनास्थळाहून पसार झाला. दरम्यान, सुनील हा तातडीने घटनास्थळी पोहचला व त्याने दरवाजाचे टाळे तोडून घरात प्रवेश केला असता तिघांचे मृतदेह पाहून तो हादरला. याबाबत माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तिथून पोलिसांनी सुशीलची डायरी जप्त केली असून त्यात एक नोट लिहिण्यात आलेली आहे. कोविड आता सगळ्यांनाच मारणार आहे. त्यामुळे आता मृतदेह मोजण्याची गरज नाही...ओमिक्रॉन!, अशा प्रकारचा मजकूर यात लिहिण्यात आला आहे. दरम्यान, यांनी घटनास्थळी पाहणी केली. डॉक्टरच्या कुटुंबीयांकडूनही त्यांनी माहिती घेतली. सुशील गेल्या काही महिन्यांपासून डिप्रेशनमध्ये होता, असे त्यांनीही सांगितले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2ZQ2SZd

No comments:

Post a Comment